new born baby girl found in kolhapur hupari 
कोल्हापूर

धक्कादायक - पुन्हा त्याच ठिकाणी सापडले स्त्री जातीचे अर्भक  

सकाळ वृत्तसेवा

हुपरी : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील भगतसिंग रोडवरील त्रिमूर्ती चौका शेजारील एका ओढ्यात स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आले. आज दुपारी हा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी हिंस्त्र प्राण्यांनी लचके तोडलेले पुरूष जातीचे एक अर्भक आढळून आले होते. 

एकाच ठिकाणी मृतावस्थेतील दोन अर्भक आढळून आल्याने रेंदाळ परिसरात खळबळ उडाली असून अर्भक टाकणाऱ्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या क्रूर आणि निर्दयी घटनांचा पोलिसांनी छडा लावण्याची मागणी होत आहे. 

रेंदाळ येथे भगतसिंग रोड लगत ग्राम पंचायतीतर्फे जेसीबीच्या सहाय्याने गटरचे काम सुरू आहे. त्यावेळी जेसीबी चालकास ओढ्यात अर्भक दिसून आले. हा प्रकार समजताच घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT