new eight corona positive case in kolhapur district 
कोल्हापूर

मोठी बातमी - कोल्हापुरात कोरोनाग्रस्त हजारच्या उंबरठ्यावर ; आणखी आठ जणांना लागण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - नुकत्याचा हाती आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी आठ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव आले आहेत.  तर गेल्या 24 तासात दोघांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ९८९  एवढी झाली आहे. आता आलेल्या अहवालांमध्ये सर्वाधिक संख्या इचलकरंजी येथील आहे. त्यामुळे इचलकरंजीवासियांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 761 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. त्यापैकी आज दिवसभरात 13 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. 


काल १८ जणांना लागण 
गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचे प्रमाण कालही कायम असून, काल १८ जणांचे अहवाल रात्री पॉझिटिव्ह आले. या वाढलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९८९ झाली आहे. 
दरम्यान, आज तेरा तर आजअखेर ७६१ जण कोरोनामुक्त घरी गेले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या १८ बाधितांसह एकूण २२ रुग्णांवर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

काल अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांत आजरा तालुक्‍यातील ८५ वर्षीय वृद्धासह पाच, चंदगड तालुक्‍यातील ६, हातकणंगले व गडहिंग्लज तालुक्‍यातील प्रत्येकी दोन तर इचलकरंजी शहर व भुदरगड व शिरोळ तालुक्‍यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आजरा तालुक्‍यात एकाच कुटुंबातील तिघे बाधित झाले असून त्यात दोन भावांसह एकाच्या पत्नीचा समावेश आहे. चंदगड तालुक्‍यातील बाधितात ६२ वर्षांच्या वृद्धासह ३८ वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. हातकणंगले तालुक्‍यात ११ वर्षांची मुलगीही बाधित झाली आहे. चार-पाच दिवसांपासून रोज जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढत आहे. ४ जुलैपासून जिल्ह्यात एकूण ७२ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण इतर जिल्ह्यातून कोल्हापुरात आले होते. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. काल दिवसभरात १४१ जणांचे स्वॅब घेतले. यापैकी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर १२४ जणांचे निगेटिव्ह आले.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT