New Employment Found From Selling Vegetables In The Textile City Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

वस्त्रनगरीत भाजीपाला विक्रीतून शोधला नवा रोजगार

पंडित कोंडेकर

इचलकरंजी ः लॉकडाउन जाहीर केल्यानंतर अनेकांचा रोजगार सुटला. त्यामुळे अशा कष्टकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले; पण यांतील अनेकांनी संकटातही संधी शोधली. यामध्ये पान टपरी, चहा, नाष्टा सेंटर, शीतपेय विक्रेत्यांसह काहीजणांनी भाजी विक्रीचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे हातात चलन आल्यामुळे लॉकडाउनच्या काळात भाजी विक्रीचा अनेकांना मोठा आधार ठरला आहे. लॉकडाउन संपल्यांनतरही हाच व्यवसाय पुढे कायम ठेवण्याचा विचार यांतील काहीजण करीत आहेत. 

वस्त्रनगरीत आलेल्या प्रत्येकाच्या हाताला काहीना काही तरी काम मिळतेच. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण इचलकरंजीत आले. साहजिकच इचलकरंजी म्हणून मिनी भारत अशी ओळख आहे; पण कोरोनाच्या संकटानंतर वस्त्रनगरीतील रोजगाराचे चित्रच बदलले आहे. रोजगार नसल्यामुळे परप्रांतीय कामगार आपल्या मूळ गावी परतू लागले; पण स्थानिक श्रमिकांच्या रोजगाराचा तूर्तास प्रश्‍न निर्माण झाला. काहीजणांचे छोटे-मोठे व्यवसाय बंद राहिले. त्यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्कटली; 

पण संकटातही काहीजणांनी संधी शोधली. पालिकेने दररोज सकाळी 6 ते 10 या वेळेत शहरातील विविध 22 ठिकाणी भाजीपाला विक्री करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार हातचा रोजगार गेलेल्या अनेकांनी पर्याय म्हणून भाजीपाला विक्रीचा तात्पुरता व्यवसाय सुरू केला. पान टपरी, चहा गाडा, नाष्टा सेंटर, शीतपेय विक्रेते यांनीही लॉकडाउनच्या कालावधीत भाजीपाला कधी बाजारात बसून, तर कधी वाहनातून विक्री सुरू केला. त्यामुळे हातात पैसा पुन्हा खेळू लागला. यातून अडचणीच्या काळात अनेकांच्या संसाराला मोठी मदत झाली. भाजीपाला विक्रीतूनही चांगली कमाई होत असल्यामुळे हाच व्यवसाय पुढे चालू ठेवण्याच्या मानसिकतेत अनेकजण आहेत. 

नव्या रोजगाराच्या संधी 
लॉकडाउनमुळे अनेक परप्रांतीय कामगार परतले. यामध्ये अनेक कारागीरांचाही समावेश आहे. पुढील काही महिने तरी हे कामगार परत येतील, अशी शक्‍यता नाही. त्यामुळे स्थानिकांना विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

आता चांगला जम बसला
माझे छोटे हॉटेल होते; पण लॉकडाउनमुळे हॉटेल बंद ठेवावे लागले. तात्पुरता पर्याय म्हणून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. आता यामध्ये चांगला जम बसला आहे. 
- अनिल डांगरे, नवीन भाजीपाला विक्रेता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

SCROLL FOR NEXT