New Entrepreneurs Did Not Get Land In Halkarni Industrial Estate Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

हलकर्णी औद्योगिक वसाहतीत दलालीचा "उद्योग' तेजीत

सुनील कोंडुसकर

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीत "दलाली'चा उद्योग तेजीत आहे. वसाहतीतील प्लॉट गरजूंना जादा किमतीने विकून नफा कमावला जात आहे. त्यामुळे नव उद्योजकांना अपेक्षित दरात जागा उपलब्ध होत नसल्याने नवीन उद्योग उभारणीचे काम कासवगतीने आहे. शासनाच्या औद्योगिक विकास महामंडळाकडून काटेकोरपणे छाननी करून अनेक वर्षांपासून पडून असलेले प्लॉट ताब्यात घ्यावेत आणि नव उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे. 

1991 ला शासनाच्या प्रत्येक तालुक्‍यासाठी औद्योगिक वसाहत स्थापन करण्याच्या उद्देशानुसार ही वसाहत स्थापन झाली. त्यासाठी 192.40 हेक्‍टर जमीन संपादित करण्यात आली. कृषीमाल प्रक्रिया व इतर उद्योगांची उभारणी व्हावी. त्यातून शेतकऱ्यांना योग्य दर आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा हा हेतू होता, परंतु अनेक वर्षे त्याला प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या पंधरा वर्षात मात्र काही उद्योग सुरू झाले.

पाच वर्षापूर्वी एव्हीएच केमिकल्स कंपनीने सुमारे 80 एकर जमीन ताब्यात घेऊन प्रकल्प उभारणी केली. त्याला विरोध झाल्याने हा प्रकल्प माघारी गेला. ही जमीन औद्योगिक विकास महामंडळाकडे पूर्ववत प्राप्त झाली, परंतु गरजुंना प्लॉट मिळत नसल्याची तक्रार आहे. काहींनी स्वतःच्या, नातेवाइकांच्या नावे प्लॉट ताब्यात घेऊन गरजूंना चढ्या किमतीने विक्री केल्या आहेत.

काहींनी इमारती उभ्या करून त्या भाडोत्री तत्त्वावर दिल्या आहेत. त्यामुळे ज्या हेतूने ही वसाहत स्थापन झाली तोच मागे पडत आहे. महामंडळाला याची माहिती असूनही कारवाई केली जात नाही. केली तरी जुजबी दंड रक्कम भरून व्यवहार सुरळीत केला जातो. त्यामुळे मूळ प्लॉटधारक पैसा मिळवून बसतो. यासंदर्भात महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्लॉटची विक्री किंवा भाडे तत्त्वावर देताना महामंडळाची परवानगी गरजेची असल्याचे सांगितले. तसे न करता परस्पर व्यवहार होत असल्याने आपल्याला माहिती मिळत नसल्याचे उत्तर दिले. 

सर्वसामान्यांना जागा मिळवणे अवघडच 
दरम्यान, सध्या या वसाहतीत जे काही प्लॉट शिल्लक आहेत, त्यांची टप्प्याटप्प्याने ई टेंडरिंग पध्दतीने विक्री केली जात असल्याचे सांगण्यात आले. इच्छुकांनी महामंडळाच्या जाहिरातीला अनुसरून अर्ज केल्यास त्यांना जागा मिळू शकते, असे स्पष्ट करण्यात आले, परंतु हा व्यवहार इतका सरळ नाही. त्यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याने सर्वसामान्य उद्योजकांना जागा मिळवणे अवघडच असल्याचे बोलले जाते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT