new two hundred corona case in kolhapur 
कोल्हापूर

काय आहे कोल्हापुरातील कोरोनाची स्थिती? ; आज सायंकाळपर्यंत दोनशे नव्या रूग्णांची भर  

शिवाजी यादव

कोल्हापूर - जिल्ह्यात गुरूवारी रात्री बारापासून सायंकाळपर्यंत दोनशे नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत. तर जवळपास 102 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. चौघाजणाचा मृत्यू झाला आहे. आज सापडल्या दोनशे रूग्णांमुळे आजवरची कोरोनाबाधितांची एकूण संख्या 26 हजार 944 इतकी झाली आहे तर कोरोनाबाधित मृतांची संख्या एकूण 808 इतकी झाली आहे. कोरोना मुक्तांची संख्या 16 हजार 884 झाली आहे. 

गेल्या आठ दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून कोल्हापूरकरांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, कागल तसेच शिरोळ या भागात कोरोना बाधितांची संख्येत दिवसाला 20 ते 150 हून अधिक आहे. तर शाहूवाडी, चंदगड, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा अशा डोंगरी तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्‍यात येत आहे. 

जिल्हाभरातील 14 कोवीड सेंटरवर सद्या 8 हजार 700 वर रूग्ण सद्या उपचार घेत आहेत. यातील 127 व्यक्तीची प्रकृतीं गंभीर आहे तर उर्वरीत सर्व व्यक्तींचा प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बाधितांची संख्या नियंत्रणात येत असल्याचे चित्र काही भागात जरूर आहे. यात गगनबावडा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी तालुक्‍यात बाधितांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. दुसरीकडे कोल्हापूर शहरासह करवीर, हातकणंगले तालुक्‍यात बाधितांचे प्रमाण वाढते आहे. या तालुक्‍यातील बहुतांशी रूग्ण शहरात उपचाराला येत आहेत. यात गेल्या तीन दिवसात शहरात सातशेपेक्षा अधिक संख्येने बाधित सापडले आहेत. या सर्वांवर शहरातील सहा कोविड सेंटरसह सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱ्या बाधितात एकूण १२६ व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील १४ शासकीय रूग्णालयात एक हजार २०० व्यक्तींचे नवीन स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. 

कोल्हापूरची स्थिती चिंताजनक
कोल्हापुरातील गेल्या तीन महिन्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिंता व्यक्त केली. जिल्ह्याला कोरोना लढ्यात काही अडचण असल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन सहकार्य करेल, मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोल्हापूरसह सातारा, सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे घेतला. 

त्यात त्यांनी कोल्हापुरविषयी चिंता व्यक्त केली. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे शक्‍य आहे. येथील सर्वसामान्यांचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता, त्याचपद्धतीने कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्‍यक असल्याचेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Woman Army Officer : कोल्हापूरची ताराराणी दुश्मनाला करणार नेस्तनाबूत! २३ वर्षीय सई जाधवची IMA मध्ये ऐतिहासिक निवड, १६ पुरुषांमधून निवड

Devendra Fadanvis Statement : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, खात्यांचा पदभार सोपवला

IND U19 vs SL U19 SF Live: भारत-श्रीलंका सामना रद्द झाल्यास कोण जाईल फायनलला? बांगलादेशकडून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Epstein Files Explained : मोदी सरकार कोसळणार? एपस्टीन फाइल्स काय आहे, भारतातील नेते का घाबरले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT