Nilam Gorhe  
कोल्हापूर

Nilam Gorhe: आधी दिव्याखालचा अंधार तपासा ; नीलम गोऱ्हे यांची सुषमा अंधारेंवर टीका

सकाळ डिजिटल टीम

Nilam Gorhe: ‘ललित पाटील याच्या पक्षप्रवेशाचा फोटो दाखवून त्यातील दादा भुसे यांची चौकशी करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. मात्र त्या फोटोत उद्धव ठाकरे देखील आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांचे सातबारे पाहून टीका करणे बरोबर नाही.

आधी आपल्या दिव्याखाली असणारा अंधार तपासा,’ अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. आज शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

गोऱ्हे यांनी नवरात्रीनिमित्त श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अमली पदार्थांच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ललित पाटील याचे आणि माजी मंत्री दादा भुसे यांचा एकत्रित फोटो आहे. त्यावरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भुसे यांची चौकशी करावी, असे विधान केले.

याबाबत विचारले असता गोऱ्हे म्हणाल्या, ‘ललित पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करतानाचा तो फोटो आहे. त्यामुळे दादा भुसे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आणखी एक नेताही दिसत आहे. मग त्यांचीही चौकशी करायची का? असे होत नाही. राजकीय व्यक्तींबरोबर अनेकजण फोटो काढतात. त्यावरून त्यांची चौकशी होत नसते. मुळात तो ललित पाटील इतके दिवस रुग्णालयात का होता हे तपासले पाहिजे. त्यासाठी कारागृह प्रशासनही जबाबदार आहे.

‘महिला आरक्षणासाठी २३ वर्षे वाट पहावी लागली. पंधरा वर्षे युपीएचे बहुमत असूनही महिला आरक्षण विधेयक पास झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची आवश्यकता ओळखून हे विधेयक पास केले. यामुळे आता महिलांना सभागृहातही पुरुषांच्या बरोबरीने प्रतिनिधित्व मिळणार आहे. राज्यातही महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. नारीचेतना अंतर्गत या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे गोऱ्हे म्हणाल्या.


‘समाजात अनेक कारणांनी महिलांना एकटेपणाने आयुष्य जगावे लागते. अशा महिलांना आधार देण्यासाठी विविध योजना आहेत. प्रत्येक जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी व्हावी. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात अशा महिलांच्या पुनर्वसनासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन गोऱ्हे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT