nilgir sakal
कोल्हापूर

कर्नाटक-महाराष्ट्रातील भाविकांचा हिरमोड ; निलगार गणपतीचे दर्शन बंद

उपनिरीक्षक कोगेनहळ्ळी ; संकेश्वर पोलिस ठाण्यात शांतता बैठक

सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर (बेळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना यंदा सार्वजनिक जागेत मंडप उभारण्यास बंदी आहे. शिवाय मिरवणुकीत डॉल्बी, बेंजो, बँड ही वाद्ये लावण्यास मज्जाव आहे. केवळ मंदिर किंवा घरात गणेशाची प्रतिष्ठापना करु शकतो.

नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील निलगार गणपतीचे यंदाही दर्शन बंद असणार आहे, अशी माहिती उपनिरीक्षक गणपती कोगेनहळ्ळी यांनी दिली. गुरुवारी (ता. 26) पोलिस ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन प्रसंगी बोलत होते.

नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.

उपनिरीक्षक कोगेनहळ्ळी म्हणाले, संकेश्वरचा प्रसिद्ध नवसाच्या निलगार गणपतीचेही यंदा भक्तासाठी दर्शन बंदच राहणार आहे. त्यामुळे लाखो भाविकांचा हिरमोड होणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्यां भक्तांनी त्याची दखल घ्यावी. बैठकीस संकेश्वर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील संकेश्वरसह कणगला, बुगटे आलूर, सोलापूर, निडसोशी, गोटुर, करजगा, अंकले, कमतनूर गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT