No Compensation Received In Korivade Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

प्रतिचेरापुंजीची अशीही उपेक्षा

रणजित कालेकर

आजरा ः गतवर्षी सर्वत्र अतिवृष्टी झाली याच फटका अनेक घटकांना बसला. जनजीवन विस्कळित झाले होते. आजरा तालुक्‍यातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. महाराष्ट्रातील प्रतिचेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्‍यातील किटवडे गावाला मात्र एक वर्षानंतरही नुकसान भरपाई मिळू शकलेली नाही. तालुक्‍यात सव्वा तीन कोटी रुपयाचे वाटप झाले मात्र निधी अभावी हे गाव वंचित राहिले आहे. 

गेल्या वर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. या काळात नद्यांना महापूर आले. पूल, बंधारे, रस्ते, पीक, शेती, जनावरे वाहून गेली. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. अतिवृष्टीनंतर गतवर्षी अवकाळी व परतीच्या पावसानेही मोठा दणका दिला. महापुरात वाचलेली पीक अवकाळी व परतीच्या पावसाने भुईसपाट झाली. हे चित्र आजरा तालुक्‍यातही होते.

तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने विविध प्रकारच्या अनुदानातून 12 हजार 10 शेतकरी व इतर लाभार्थ्यांना 3 कोटी 29 लाख 27 हजार 541 रुपयांचे वाटप केले. मात्र राज्यात प्रतिचेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे किटवडे हे गाव नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहे.

या गावात पावसाने मोठे नुकसान झाले होते. नुकसानीची रक्कम 42 लाख रुपये इतकी आहे. महसूल विभागाने नुकसान भरपाईच्या रकमेची मागणी शासनाकडे केली असून याचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. गतवर्षीची नुकसानीची रक्कम पदरात नाही त्यात यंदाही अतिवृष्टीचे भाकित केल्यामुळे किटवडे ग्रामस्थांमध्ये चिंतेची छाया आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT