No decision taken about Agricultural University 
कोल्हापूर

कृषी विद्यापीठाबाबत आताच निर्णय नाही 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : कृषीप्रधान असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावे, अशी मागणी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. कोल्हापूरमध्ये खरीप हंगामाच्या आढावा बैठकीसाठी मंत्री भुसे आले होते. दरम्यान, कृषी विद्यापीठाबाबत सर्वपातळीवर विचार करावा लागेल. आताच निर्णय घेता येणार नाही. राज्यातून अनेक ठिकाणी मागणी होत आहे. त्यामुळे यासाठी मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिंधीसोबत एकत्रित चर्चा करावी लागेल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. 

खासदार माने म्हणाले,""जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून प्रामाणिकपणे कर्जपरतफेड केली जाते. त्यांना तत्काळ नवीन पीककर्ज मिळावे, त्यांना प्रोत्साहनात्मक रक्कमही मिळाली पाहिजे. लॉकडाउनमुळे नुकसान होत आहेत. सर्वांना पीककर्ज मिळावे. खावटीचे कर्ज नियमित कर्ज म्हणून शेतकऱ्यांना कर्ज मिळावे. याशिवाय कोल्हापूर हा कृषीप्रधान जिल्हा आहे. यात कृषी विद्यापीठ आले तर शेतीचे विविध प्रयोग करता येणार आहेत.'' 

आमदार आबिटकर म्हणाले,""कृषीमंत्र्यांनी राज्यात केलेल्या स्टिंग ऑप्रेशनमुळे इतर दुकानदारांवरही वचक बसली आहे. युरियाच्या लिंकिंगबाबतही कृषीमंत्र्यांनी ठोस लक्ष घातले आहे. त्यामुळे चुकीेच वागणाऱ्यांवर कारवाई होईल. दरम्यान, जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ झाल्यास जिल्ह्यासह आजूबाजुच्या सर्व विद्यार्थांना याचा लाभ होणार आहे. 

आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूरात कृषी विद्यापीठ होण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न केले जातील. कृषीमंत्र्यांनीही याचा पाठपुरावा करावा. यामुळे कोल्हापूरसह सीमाभागात असणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थांनाही फायदा होणार आहे. जिल्ह्यातील सहकारी सेवा संस्थांना खत विक्रीचा परवाना द्यावा.'' तत्पूर्वी, खासदार संजय मंडलिक यांनीही जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावे, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातील विद्यार्थांनाही याचा फायदा होईल, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. 
.. 
परवानगी द्यावी... 
जिल्ह्यातील सहकारी सेवा संस्थांना मिश्र खतांची मोठी मागणी आहे. त्यामुळे मिश्र खत निर्मितीला शासनाने परवानगी द्यावी, अशीही मागणी आमदार पाटील यांनी केली. 

दृष्टिक्षेप 
- कोल्हापूरात खरीप हंगामाची आढावा बैठक 
- कृषी विद्यापीठासाठी एकत्रित चर्चा करावी लागेल: भुसे 
- राज्यातून अनेक ठिकाणी कृषी विद्यापीठाची मागणी : भुसे 
- कृषी विद्यापीठ आल्यास शेतीचे विविध प्रयोग शक्‍य : खासदार माने 
- ग्रामीण भागातील विद्यार्थांना लाभ : आबिटकर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

Monsoon : मॉन्सून २६ मे पर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत

ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी २१ मे पासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू; राज्यात दीड लाखांहून अधिक जागा

SCROLL FOR NEXT