No diesel price hike, ban on fertilizer transport
No diesel price hike, ban on fertilizer transport 
कोल्हापूर

डिझेल दरवाढ दिली नाही, केली खत वाहतूक बंद 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : डिझेल दरवाढ न मिळाल्याच्या कारणावरून लोकल मालट्रक मालक चालक वेल्फेअर असोसिएशनतर्फे खत वाहतूक आज बंद ठेवली. रेल्वेच्या 21 डब्यांमधून आलेल्या 13 हजार टन खत वाहतुकीसाठी ठेकेदारांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागला. ट्रक चालक मालक ठेकेदारांविरोधात संताप व्यक्त करत दिवसभर मार्केट यार्डात थांबून राहिले. 

रेल्वे डब्यातून येणाऱ्या मालाची वाहतूक करण्यासाठी मालक चालक वेल्फेअर असोसिएशनचे 110 ट्रक आहेत. ट्रक मालक चालकांनी डिझेल दरवाढ मिळण्यासाठी ठेकेदारांशी पत्रव्यवहार केला होता. पत्राची दखल ठेकेदारांनी घेतली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आज असोसिएशनने खत वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला. 1 जूनला डिझेल प्रतिलिटर 66 रुपये 50 पैसे होते. आजअखेर डिझेल दरवाढ प्रतिलिटर 80 रुपये 24 रुपये झाले. 14 रुपये प्रतिलिटर झालेली दरवाढ मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. ती मान्य न झाल्याने आज ट्रकचालक मालकांत असंतोष पसरला. त्यांनी रेल्वे डब्यातील खत वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेऊन ठेकेदारांविरुद्ध घोषणा दिल्या. 

त्यामुळे ठेकेदारांना पर्यायी वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या गाड्यांसह अन्य वाहनांचा आधार घ्यावा लागला. असोसिएशनचे अध्यक्ष विजय कडवेकर, उपाध्यक्ष प्रकाश भोसले, सचिव संजय सावंत, खजिनदार सुभाष आढावकर, विशाल भांडवलकर, झहीर मुजावर, दादासाहेब महेकर, महादेव गायकवाड, बाबासाहेब फराकटे, श्रीरंग पाटील, संदीप हराळे आंदोलनात सहभागी झाले होते. 

दृष्टिक्षेप 
- मालट्रक मालक चालक वेल्फेअरचे आंदोलन 
- 21 डब्यांमधून 13 हजार टन खत वाहतूक 
- मालट्रकचे 110 ट्रक कार्यरत 
- डिझेल दर प्रतिलिटर 66.50 हून पोचले 80.24 रूपयांवर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT