"No entry" To Doctors, Bank Employees In Sangli Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

डॉक्‍टर, बॅंक कर्मचाऱ्यांना सांगलीत "नो एन्ट्री'

सकाळवृत्तसेवा

जयसिंगपूर : सांगलीत बॅंक कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यु झाल्यानंतर सांगली जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सिमा बंद केल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून जयसिंगपूर व परिसरातील डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी आणि बॅंक कर्मचाऱ्यांनाही उदगाव आणि अंकलीच्या दोन्ही बाजूला पोलिसांनी एन्ट्री दिली नाही. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवेतील डॉक्‍टर मंडळींनाही अंकली टोल नाक्‍यावर ताटकळत रहावे लागत आहे, तर दुसऱ्या बाजूला सांगली पोलिस प्रशासनाकडून आदेश आले तरच सोडू, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने डॉक्‍टर आणि बॅंक कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. 

सांगलीत बॅंक कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यु झाल्यानंतर जिल्ह्याच्या सिमांवर कडक बंदोबस्त राखला आहे. याआधी अत्यावश्‍यक सेवेतील डॉक्‍टरांसह इतरांना मोकळीत होती. मात्र, गेल्या दोन दिवसापासून सर्वांनाच प्रवेश बंद केल्याने डॉक्‍टरांचीही पंचाईत झाली आहे. मिरज सिव्हीलला कोरोना हॉस्पिटलचा दर्जा दिल्याने मिरज सिव्हीलमधील सर्व विभाग सांगली सिव्हीलमध्ये कार्यान्वित केले आहेत. यामुळे सांगली सिव्हीलमधील आरोग्य सेवेवर ताण पडला आहे. 

जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी आदी भागातील डॉक्‍टर, समुपदेशक, स्टाफ नर्स, सफाई कामगारांची सांगलीकडे ये-जा असते. गेल्या महिन्याभरापासून अत्यावश्‍यक सेवेतून ते आरोग्य सेवेसाठी तत्पर होते. आता मात्र पोलिसांकडून दोन्ही बाजूला त्यांना रोखले जात आहे. परिणाम गेल्या दोन दिवसापासून डॉक्‍टर मंडळींकडून वर्क फ्रॉम होम काही प्रमाणात सुरु आहे. कोरोनाच्या संकटकाळात खऱ्या अर्थाने डॉक्‍टर मंडळींची गरज आहे. मात्र, सांगली जिल्हा पोलिस प्रशासनाने त्यांच्याबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, प्रवेशच नाकारला जात असल्याने सांगली सिव्हीलसह अन्य डॉक्‍टर, समुपदेशक, स्टाफ नर्स, सफाई कामगारांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

पण जागा आहे कुठे? 
सांगली जिल्हा प्रशासनाकडून डॉक्‍टर, समुपदेशकांना मुख्यालयात रहा, असे सांगितले आहे. मात्र, सध्या वैद्यकीय सेवेवरील ताण, विभागांमधील करण्यात आलेला बदल लक्षात घेता रहाण्याची सोय नाही. त्यामुळे डॉक्‍टर मंडळींची अवस्था "ना घरका ना घाटका' अशीच झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT