No entry for guests in Zilla Parishad 
कोल्हापूर

जिल्हा परिषदेत बाहेरच्यांना आता अनिश्‍चित काळासाठी "नो एन्ट्री'

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उद्या (ता. 7) पासून जिल्हा परिषदेत अभ्यागतांना अनिश्‍चित काळासाठी प्रवेश बंदी केल्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिले. तसेच येणारे टपाल स्वीकारण्यासाठी मुख्य दरवाजातच कर्मचाऱ्याची नियुक्‍ती करण्याची सूचनाही दिली. 

मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी करूनच प्रवेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या अभ्यागतांचे महत्त्वाचे काम असेल त्यांना थेट प्रवेश न देता आरोग्य तपासणी केली जाणार आहे. कामाची गती वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी ई-मेल, दूरध्वनी व इतर सुविधांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी कामावर येताना गणवेशासह मास्क, हातमोजे वापरावेत. कामकाजाच्या ठिकाणी साबण, पाणी व हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध असल्याची खातरजमा करावी. कामकाजाला सुरवात करण्यापूर्वी हात साबण व पाण्याने किमान 20 सेकंद स्वच्छ धुवावेत. 

कार्यालयाचे नियमित वापराचे दरवाजाचे हॅन्डल, पाण्याचे नळ हे दर दोन ते तीन तासांनी निर्जंतुकीकरण करावेत. दोन व्यक्तींमधील कमीतकमी अंतर एक मीटर ठेवावे. भ्रमणध्वनी शक्‍यतो स्पिकर फोनवर वापर करावा. कार्यालय प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना चहा-नाश्‍ता व जेवणासाठी कॅन्टीनमध्ये जाण्यापासून परावृत्त करावे. आवश्‍यकता असलेस कॅंटीनमधून पार्सल मागवावे. शक्‍यतो सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक संरक्षक साधनांचा वापर करावा, असेही परिपत्रकात म्हटले आहे. 

दृष्टिक्षेप 
- अनिश्‍चित काळासाठी बंदी 
- प्रवेशद्वारात कर्मचारी नियुक्तीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश 
- महत्वाचे काम असणाऱ्या अभ्यागतांची होणार तपासणी 
- कामासाठी ईमेल, मोबाईल व अन्य सुविधांचा वापर होणार 
- कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे अनिवार्य 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT