no entry on jyotiba hill yesterday 
कोल्हापूर

जोतीबा डोंगरावर उद्या चांगभलचा जयघोष होणार नाही 

निवास मोटे

जोतिबा डोंगर  - दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा दुसरा खेटे ही भाविकांना उद्या होत आहेत . उद्या मंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे चांगभलचा जयघोष ऐकायला मिळणार नाही.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई व देवस्थान व्यवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. भाविकांनी रविवारी डोंगरावर येऊ नये असे अवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उद्या पहाटेपासून डोंगराच्या पायथ्याशी असणारे  सर्व रस्ते बंद करण्यात येणार असून सर्वत्र पोलिस बंदोबस्त सज्ज  ठेवण्यात येणार असल्याचे कोडोली पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरिक्षक दिनेश काशीद यांनी सांगितले. मंदिरात होणारे सर्व धार्मीक विधी करण्यास कमीत कमी मानकरी पुजारी भाविक यांना परवानगी दिली आहे. सोमवार ते शनिवार मंदिर सुरू राहील. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहील. या वेळेत भाविकांना दर्शन घेता येईल. 

यंदा पाच रविवारी खेटे आहेत. होळी पौर्णिमेच्या दिवशी या सर्व खेटयांची सांगता होणार आहे. त्यानंतर येणाऱ्या पोर्णिमेस चैत्र यात्रा होते. 

माघ महिन्यात भरणाऱ्या रविवारच्या यात्रेस जोतिबाचे खेटे असे म्हणतात. या खेट्यांचे वैशिठ्ये म्हणजे अख्खं कोल्हापूर जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी येते. सर्रास भाविक अनवाणी पायाने डोंगर चढतात. चांगभलच्या जयघोषाने सर्व पायी रस्ते दुमूमून जातात. डोंगर गुलालमय होतो. दरवर्षी ही खेट्याची यात्रा कोल्हापूर वाशीय मोठ्या उत्साहात साजरी होते. 

दरम्यान, गेल्या वर्षी शेवटचा खेटा झाला आणि कोरोनामूळे मंदिर बंद झाले. त्यानंतर ८ महिने मंदीर झाले. पुन्हा ते दिवाळी पाडव्यास सुरु झाले. यंदा खेटयास बंदी घातल्याने अनेकांना फटका बसणार आहे. डोंगरावरील लहान सहान व्यापारी दुकानदार विक्रेते यांना तर जीवन जगने मुश्कील होऊन बसले आहे. गेल्या वर्षी त्यांना फार यातना सहन कराव्या लागल्या. 
डोंगरावर येणाऱ्या सर्व भाविकांनी सोशल ड्रिस्टून्स पाळणे गरजेचे आहे. 
 
 
  संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT