No tension to the police this year 
कोल्हापूर

हद्‌पारीचे यंदा पोलिसांना नो टेन्शन..

राजेश मोरे

कोल्हापूर : कोरोना संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव हा नियमावलीनुसारच साजरा होतोय. उत्सव काळात गुन्हेगारांना हद्‌पार करण्याच्या प्रक्रियेपासून पोलिसांची यंदा सुटका झाली पण नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी मात्र पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. 

गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा व्हावा, यासाठी पोलिस यंत्रणा दोन महिने अगोदर कामाला लागते. लाखो भक्तांची गर्दी उत्सवात असल्याने आवश्‍यक त्या उपाययोजना पोलिसांकडून केल्या जातात. हाणामाऱ्या, अवैध धंद्यावर वचक ठेण्याचेही आव्हान पोलिसांना पेलावे लागते. त्यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळांच्या शांतता बैठका घेऊन कायदेशीर बाबी समाजवून सांगाव्या लागतात. उपद्रवी, रेकॉर्डवरील गुंडांची यादी काढून त्यांना शहर, तालुका, जिल्हा अगर राज्यातून हद्‌पार करण्याचे प्रस्ताव तयार करावे लागतात. ते मंजुरीसाठी पाठवावे लागतात. हद्‌पार केलेले अगर ठराविक मिरवणुकीदिवशी स्थानबद्ध केलेल्या गुंडांना त्या त्या हद्दीतून बाहेर काढले जाते. 
असे गुंड पुन्हा हद्‌पार केलेल्या भागात पुन्हा वास्तव्यास आलेत का? याची माहिती घेऊन कारवाई करावी लागते. याचबरोबर कायदा सुव्यवस्था, दैनदिन काम व बंदोबस्त असा ताण गणेशोत्सवात पोलिसांवर असतो. 

संपूर्ण देश कोरोना संकटाचा मुकाबला करतो आहे. या काळात मार्चपासून पोलिस यंत्रणा कोरोना योद्धाचे काम करत आहे. कोरोनाचे संकटाचा विचार करून शासनाने गणेसोत्सवासाठी नियमावली तयार केली आहे. यात आगमन व विसर्जन मिरवणुकीला बंदीसह मंडपाची लांबी रुंदीही निश्‍चित केली. या महामारीचा विचार करून शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच मंडळे यंदाचा उत्सव हा साधेपणाने व विधायक उपक्रमांनी साजरा करण्यासाठी पुढे आले आहेत. यंदा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्‌पार करण्याचे पोलिसांना टेन्शन नाही. पण कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी नियमावलीसह सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यासाठी पोलिस मात्र कर्तव्य सांभाळून रस्त्यावर बंदोबस्तात आहेत. 

गतवर्षी हद्‌पार झालेले गुंड 
*जिल्ह्याबाहेर - 254 
*शहर तालुका - 461 
*मिरवणुकी दिवशीसाठी स्थानबद्ध - 1343 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT