No Wearing Mask Properly In Ichalkaranji Market Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजी बाजारात अनेकांचे मास्क हनुवटीवरच

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : आठवडी बाजारात सोशल डिस्टन्सच्या फज्जासह कोरोनाचे निर्बंध विक्रेते व ग्राहक पायदळी तुडवत असल्याचे पहायला मिळत आहे. 85 टक्के विक्रेते विनामास्क भाजीपाला विक्रीसाठी बसत असून अनेक नागरिकांचे चेहऱ्यावरील मास्क हनुवटीवर असल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या बाजारातील नागरिकांच्या या चुका कोरोना संसर्ग वाढण्यास पोषक आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची वाढती चेन ब्रेक करण्याऐवजी सध्या ती वाढतच जाईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

शहरात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेकडून आठवडी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी बाजार भरविण्यासाठी 18 ठिकाणे निश्‍चित केली. पहिल्या आठवड्यात नियमीत आठवडी बाजाराची ठिकाणे सोडून निश्‍चित केलेल्या ठिकाणी बाजार भरला. मात्र पूर्णपणे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत रस्त्यावर लांबलचक विक्रेत्यांनी रांगा लावल्या. त्यामुळे गर्दी टाळण्याच्या अपेक्षेने आठवडी बाजाराचे पालिकेचे नियोजन फसल्याचे पहायला मिळाले.

पुन्हा या आठवड्यात शुक्रवारी भरणारा बाजार निश्‍चित केलेल्या ठिकाणांसह मुख्य आठवडी बाजाराच्या ठिकाणी भरला. बाजाराच्या ठिकाणी पूर्णपणे कोरोना नियमांचे पायमल्ली झाल्याचे दिसून आले. विक्री करणारा प्रत्येक विक्रेता विनामास्क तर घातलेला मास्क हनुवटीवर आलेला दिसला. बाजारात येणाऱ्या ग्राहकांचीही अवस्था अशीच होती. प्रत्येकाला मास्क घालणे बंधनकारक केले असले तरी मुळ गर्दीच्या असणाऱ्या बाजाराच्या ठिकाणीच विनामास्क परिस्थिती आढळून आली. 

नगरपालिकेची कारवाई महत्वाची 
शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे. मात्र शुक्रवारी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार भरला आणि या ठिकाणी कोरोना निर्बंधाचे अजिबात पालन न केल्याचे पहायला मिळाले. बाजाराच्या ठिकाणी नगरपालिकेकडून कारवाई होताना दिसली नाही. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी कारवाईच्या माध्यमातून आठवडी बाजारावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. 

संपादन - सचिन चराटी

Kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT