Non Governmental Board of Governors on Kolhapur Market Committee  k p Patil Chief Administrator
Non Governmental Board of Governors on Kolhapur Market Committee k p Patil Chief Administrator 
कोल्हापूर

कोल्हापूर बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ ; 'हे' माजी आमदार मुख्य प्रशासक

शिवाजी यादव

कोल्हापूर - जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ जाहिर झाले आहे. यात माजी आमदार के. पी. पाटील यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड झाली आहे. मंडळात सर्व अशासकीय व्यक्तींच्या पात्रतेतेची शहानिशा करून नियुक्ती करावी असे आदेश कार्यसन अधिकारी जयंत भोईर यांच्या सहीने जिल्हा निबंधकांना देण्यात आले आहेत. 

जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने नुकताचा राजीनामा दिला. त्यानंतर येथे जिल्हा निबंधकांनी प्रशासक म्हणून प्रदीप मालगावे यांची निवड केली होती. त्यांनी प्रशासक म्हणून चार दिवस बाजार समितीचा कारभार ही पाहीला आहे. अशात बाजार समितीवर अशासकीय नियुक्ती केल्याची माहिती जिल्हास्तरावर आली आहे. 

नव नियुक्त अशासकीय प्रशासक मंडळ

कृष्णराव पाटील मुख्य प्रशासक (मुधाळ, ता. भुदरगड), प्रा. जालंदर पाटील (राशिवडे, ता. राधानगरी), बळीराम पाटील (वडणगे, ता. करवीर), सचिन घोरपडे ( वाघापूर, ता. भुदरगड), करणसिंह गायकवाड (सुपात्रे, ता. शाहूवाडी), कल्यानराव निकम (वसरेवाडी, ता. भुदरगड), सुर्यकांत पाटील (बामणी, ता. कागल), राजेंद्र पाटील (सोळांकूर ता. राधानगरी), दिगंबर पाटील (दिंडर्नेली ता. करवीर), अजित पाटील (माले. ता. करवीर), अजित पाटील (परिते, ता. करवीर), सुजाता सावडकर (अणूर, ता. कागल), दगडू भास्कर (रा. कुडीत्रे, ता. करवीर) यांचा समावेश आहे. या सर्वांची अशासकीय प्रशासक मंडळासाठी पात्रतेची शहानिशाकरून जिल्हा निबंधकांकडून संबधीत मंडळाला अंतिम नियुक्ती दिली जाणार आहे. 

चौकशी नंतर अशासकीय मंडळ 

शेती उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या काळात नोकर भरती जागा हस्तांतरनासह अन्य काही विषयावर जिल्हा निबंधक तसेच पणन संचालकांकडे गेल्या महिन्या तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर जिल्हा निबंधकांनी बाजार समिती कारभाराची तीन सदस्यांकडून चौकशी केली होती. संबधीत समितीने चौकशी अहवाल सादर केल्यानंतर बाजार समितीवर प्रशासक म्हणून श्री. मालगावे यांची नियुक्ती झाली. याच वेळी काही राजकीय घडामोडीही झाल्या यातून बाजार समितीवर अशासकीय प्रशासकीय मंडळ जाहिर झाले आहे. 

संपादन - मतीन शेख
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT