Not argument between mahendra singh dhoni and rohit sharma fans kolhapur kurundwad 
कोल्हापूर

कोल्हापुरात महेंद्रसिंह धोनी-रोहित शर्माचे चाहते भिडले? जाणून घ्या नेमकं काय घडलं?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापुरात कधी कुठल्या गोष्टीवरून राडा होईल हे सांगता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड याठिकाणी महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्माचे चाहते आमने-सामने आल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि गावात एकच वादळ उठलं. या वादात एकाला उसाच्या मळ्यात नेऊन चोप दिल्याचं वृत्त होतं. पण, प्रत्यक्षात असा प्रकारच घडला नसल्याचं स्पष्ट होतंय.

वीरेंद्र सेहवागचं ट्विट

महेंद्रसिंह धोनी यांनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड याठिकाणी त्याच्या कौतुकाचे होर्डिंग्ज चाहत्यांकडून लावण्यात आले. त्यानंतर लगेच रोहित शर्माला खेल रत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहितच्या चाहत्यांनी देखील कुरुंदवाड शहरात अभिनंदनाचे होर्डिंग लावले. या दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये वाद सुरू झाल्याची चर्चा होती. यातून एकाला मारहाण झाल्याचं वृत्त आलं. विशेष म्हणजे, हा विषय माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवानं ट्विट करून गोंधळात भर घातली. सेहवागच्या ट्विटमुळं सोशल मीडियावर आणखीनच या विषयाची चर्चा सुरू झाली. 

होर्डिंग्ज काढून टाकली 

रोहित शर्माच्या अभिनंदनाचे होर्डिंग्ज अज्ञातांनी फाडल्याची चर्चा होती. त्यामुळे या चाहत्यांच्या गटातील धुसफूस आणखी वाढली. होर्डिंग्ज फाडाफाडी केल्याचा कारणावरून रोहित शर्माचा फॅन असलेल्या तरुणाने राग व्यक्त करत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करणाऱ्या चाहत्याला उसाच्या मळ्यात नेऊन चोप दिल्याची चर्चा सुरू होती. पण, स्थानिक पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, संबधित होर्डिंग्ज पालिकेला सांगून काढण्यात आली असल्याची माहिती कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवडे यांनी दिली आहे. तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी देखील असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं सांगितलंय.


संपादन- धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

ACB Arrest Nashik : ZP च्या महिला अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक; आमदारांच्या तक्रारीनंतरही सुधारल्या नाहीत, कोण आहेत वैशाली ठाकरे?

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

SCROLL FOR NEXT