Notice to arrears of over Rs 11,000 for recovery; 16 crore water supply of government offices exhausted 
कोल्हापूर

वसुलीसाठी 11 हजारांवर थकबाकीदारांना नोटिसा ; सरकारी कार्यालयांची 16 कोटी पाणीपट्टी थकीत 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने 11 हजारांहून अधिक थकबाकीदारांना नोटिसा पाठविल्या तरी 28 कोटींपैकी 16 कोटींची थकबाकी नुसत्या शासकीय कार्यालयांची आहे. शहरालगतच्या 12 ग्रामपंचायतींकडे वर्षानुवर्षाची सात कोटी पाणीपट्टी थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी 11 हजारांहून अधिक जणांना नोटिसा लागू झाल्या आहेत. सात दिवसांच्या आत थकबाकी न भरल्यास पाणी कनेक्‍शन तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. पाणीपुरवठा विभाग हा महापलिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. शहरासाठी दररोज 120 एमएमएलडी पाणी नदीतून उचलले जाते. पाणी उपश्‍यापोटी वर्षाला 28 कोटी रुपयांचे वीज बिल भरावे लागते. बिगर सिंचन उपश्‍यापोटी दोन ते तीन कोटी जलजेवढे पाणी उपसले जाते, तेवढे गळतीचे प्रमाणही अधिक आहे. बालिंगा, शिंगणापूर पाणी योजनेतून शहराला पाणीपुरवठा होतो. काळाच्या ओघात पाणी उपसा करणारे पंप कालबाह्य झाले आहेत. पुरेशा दाबाने पाणी उपसा होत नाही. लॉकडाउनमुळे पाणीपट्टीच्या वसुलीवर परिणाम झाला. आता थकबाकी 28 कोटींच्या घरात पोहचली आहे. ग्रामपंचायतीची 12 कोटींची थकबाकी वसूल होणे सघ्या मुश्‍कील दिसत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा नाईलजाने बंद करावा लागणार आहे. रेल्वे, सीपीआर, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी विद्यापीठ, बांधकाम विभाग याबाबत पाणीपुरवठा विभाग कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

शासकीय कार्यालयांची 
पाणीपट्टी थकबाकी अशी 
* सीपीआर- 6 कोटी 62 लाख 
* रेल्वे विभाग- 1 कोटी. 
* शिवाजी विद्यापीठ- 66 लाख 
*पाटबंधारे विभाग - 1 कोटी 50 लाख 
*सार्वजनिक बांधकाम विभाग - 58 लाख, 
* जिल्हाधिकारी कार्यालय - 23 लाख 
* जिल्हा परिषद - 16 लाख 

पाणीपट्टी थकबाकीपोटी 10 हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्यांना सरसकट नोटिसा बजावल्या आहेत. त्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. यानंतर नळ कनेक्‍शन तोडण्याची कारवाई केली जाईल. 
- प्रशांत पंडत, पाणीपट्टी अधीक्षक.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT