Milk Dairy esakal
कोल्हापूर

Milk Dairy : दूध वजनात काटामारी, 'त्या' 16 दूध संस्थांना नोटीस; प्रशासकांची नियुक्ती करण्याचा दिला इशारा

दुधाचे फॅट तपासणीसाठी २० मिलीऐवजी ५० ते १०० मिली दूध घेतले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यात ज्या-ज्या दूध संस्थांबाबत तक्रारी येतील त्यांची तपासणी होणारच आहे. मात्र, ज्यांची तक्रार येणार नाही तरीही आमच्या कार्यालयाकडून त्याची तपासणी केली जाणार आहे.

कोल्हापूर : दुधाचे फॅट तपासणीसाठी २० मिलीऐवजी ५० ते १०० मिली दूध घेतले जात आहे. दुधाचे फॅट किंवा एस.एन.एफ. न तपासताच दूध खरेदी केली जाते, अशा करवीर तालुक्यातील चार, शिरोळमधील पाच आणि पन्हाळा तालुक्यातील सात अशा एकूण १६ संस्थांना (Milk Dairy) कामाकाजामध्ये तत्काळ बदल करावा. अन्यथा, संस्थांवर प्रशासक नियुक्त केला जाईल, असा इशारा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी (Dairy Development Officer) प्रकाश आवटे आणि सहकारी संस्था (दुग्ध) सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी दिला आहे.

दानोळी (ता. शिरोळ) येथील एका दूध संस्थेत फॅट आणि एस.एन.एफ.ची तपासणी केली जात नाही. उत्पादकांकडून येणारे दूध हे लिटरप्रमाणे संकलन केले जाते. शेतकऱ्यांना त्यानुसारच पैसे दिले जात आहेत. मात्र, शासनाने दिलेल्या प्रमाणानुसार दूध संकलन होत नसल्याने उत्पादकांना मोठा फटका बसत आहे.

करवीर तालुक्यात भामटे गावातील दूध संस्थेत केवळ फॅटच पाहून दर दिला जात आहे. याठिकाणी एस.एन.एफ. पाहिले नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात ज्या-ज्या दूध संस्थांबाबत तक्रारी येतील त्यांची तपासणी होणारच आहे. मात्र, ज्यांची तक्रार येणार नाही तरीही आमच्या कार्यालयाकडून त्याची तपासणी केली जाणार आहे.

यासाठी विशेष पथक तयार केले जाईल, याशिवाय आम्ही स्वत:ही याची तपासणी करणार असल्याचे मालगावे यांनी सांगितले. दरम्यान, ज्या-ज्या संस्थांमध्ये तपासणी झाली आणि वजनामध्ये फरक आढळला आहे, अशा संस्थांना कलम ७९ नुसार नोटीस दिली जाईल. त्यानंतरही सुधारणा झाली नाही, तर प्रशासक नियुक्त करून न्याय दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या संस्थांना नोटीस

  • शिरोळ तालुका : जनसेवा दूध संस्था आणि वसंतदादा दूध संस्था (दोन्ही संस्था दानोळी). दिरबादेवी, रत्नदीप आणि महादेवी पद्मादेवी ( उदगाव).

  • पन्हाळा तालुका : माउली, श्रीकृष्ण, महादेव आणि शिवपार्वती (सर्व संस्था मरळी). शिवशाही, छत्रपती जिजाऊ महिला आणि दत्त (मल्हारपेठ).

  • करवीर तालुका : राजर्षी शाहू, राम आणि जोतिर्लिंग दूध संस्था (सर्व संस्था भामटे). हनुमान दूध संस्था (आरळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : कोकणातील लोककलांना राजाश्रय मिळायला हवा; अनिकेत तटकरे

SCROLL FOR NEXT