कोल्हापूर

आता प्राधिकरणाला चालना, कामांना गती हवी

सुनील पाटील

 कोल्हापूर : हद्दवाढीला पर्याय म्हणून स्थापन केलेल्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला सक्षम करून लोकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी आता नवीन सरकारवर आली आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना 42 गावातील लोकांच्या समस्या जाणून घेवून, त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत.

प्राधिकरणाची स्थापना होवून दोन वर्ष झाले तरीही, प्राधिकरणकडून दिलेल्या घोषणांची अमलबजावणी झालेली नाही. जिल्ह्यातील या दोन दिग्गज मंत्र्यांसोबत मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांवरही प्राधिकरणातील समस्यांवर तोडगा काढण्याची गरज आहे. 

हद्दवाढ नको म्हणून लोकांनी प्राधिकरण स्विकारले. प्राधिकरणामुळे गावचा विकास होईल, अशी लोकांची अपेक्षा आहे. मात्र, दोन वर्षापासून याला निधी मिळाला नाही. आता याच प्राधिकरणाला नवी दिशा देवून लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्तेत येण्यापूवी 42 गावातील समस्या जाणून घेण्यासाठी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. यावेळी, या 42 गावातील बांधकाम परवाने, सोयी-सुविधा, ग्रामपंचायत आणि सरपंचांचा हक्का कायम रहावा, विषेशता बांधकाम परवाने तात्काळ मिळावेत, अशी अपेक्षा केली होती. 

सतेज पाटील यांनीही या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सतेज पाटील जरी गृहराज्यमंत्री आहे. तसेच ते कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे सतेज पाटील यांनीच प्राधिकरणाला चालना देण्यासाठी आवश्‍यक निधी किंवा लोकांचे बांधकाम परवाने देण्याबाबत पाऊल उचलावे लागणार आहेत. 

प्राधिकरणात समाविष्ठ गावे : 
 करवीर तालुका : पाडळी खुर्द, मौजे शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी, चिखली, आंबेवाडी, रजपूतवाडी, वडणगे, शिये, वळीवडे-गांधीनगर, चिंचवाड, मुडशिंगी नवे वाडदे सहित, सरनोबतवाडी, तामगाव, नेर्ली, गोकूळ शिरगाव (एम. आय. डी. सी. क्षेत्र वगळून), कंदलगाव, कणेरी, पाचगाव, भूये, निगवे दुमाला, भुयेवाडी, कणेरीवाडी, कसबा करवीर (भाग), उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उंचगाव कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र. 

हातकणंगले तालुका : टोप, कासारवाडी, संभापूर, नागाव, शिरोली (एम.आय. डी.सी. वगळून) 

प्राधिकरणाबात नतून अध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांनी माहिती घेतली आहे. त्यांनाही प्राधिकरणाची सद्यस्थितीची माहिती दिली आहे. त्यानुसार लवकरच बैठक घेतली. 
- शिवराज पाटील, 
मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणी 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT