Now identity cards are mandatory for government service officers and employees 
कोल्हापूर

आता शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे

विनायक जाधव

बेळगाव - शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यापुढे सेवेवर असताना गळ्यात आपले ओळखपत्र सर्वसामान्यांना दिसेल याप्रमाणे परिधान करावे लागेल. यासह कर्मचाऱ्यांच्या आपल्या टेबलावर आपली "नेमप्लेट" (नावाची पाटी) देखील ठेवावी लागणार आहे. शासनाने याबाबतचे आदेश 3 नोव्हेंबर रोजी बजावले असून त्याची अंमलबजावणी प्रत्येक शासकीय विभागाकडून केली जात आहे. 

महसूल, अन्न आणि नागरी पुरवठा, समाज कल्याण, इतर मागास, जिल्हा व तालुका पंचायत, ग्रामपंचायत आदींसह विविध शासकीय खात्यामध्ये सर्वसामान्य लोक आपल्या विविध कामांसाठी तसेच योजनांचा लाभ मिळविण्यासाठी येतात. पण, कार्यालयात आल्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्यास योजनेबाबत विचारल्यास ते इतर ठिकाणी बोट करतात. पण, नेमके कोणाकडे जावे हे लोकांना समजतच नाही. प्रत्येक टेबलावर एखादी व्यक्ती बसलेली असतेच. त्यामुळे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलाकडे लोकांना संबंधीत योजना अधिकाऱ्याचा शोध घेत फिरावे लागते. ही, बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने शासनाने आता कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्ती केली आहे. तसेच टेबलावर देखील नावाची पाटी लावण्याचे निर्देश दिले आहेत. कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा विभागाच्या सचिव एच. सी. हर्षाराणी यांनी याबाबतचे आदेश बजावले आहेत. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या टेबलावर आता नावाची पाटी ठेवावी लागणार असून गळ्यात शासकीय ओळखपत्र परिधान करावे लागणार आहे.

शासनाकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला तसेच अधिकाऱ्याला शासकीय ओळखपत्र दिले जाते. मात्र, असे ओळखपत्र कर्मचारी आणि अधिकारी आपल्या पर्समध्येच ठेवून देतात. केवळ इतर शासकीय कार्यालयातील कामांसाठी गेल्यावर किंवा वाहतूक पोलिसांनी अडवणूक केल्यानंतरच आपण शासकीय कर्मचारी असल्याचे दाखविण्यासाठी या ओळखपत्रांचा वापर होतो. पण, इतर वेळेस अशा ओळखपत्राचा कधीच वापर झाला नव्हता. गळ्यात ओळखपत्र ठेवणे हे केवळ कार्पोरेट कार्यालयातील कर्मचारीच करतात. पण, आता कार्पोरेटप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांनाही आपले शासकीय ओळखपत्र गळ्यात परिधान करावे लागणार आहे. तर नागरिकांना देखील आपल्या कामासाठी कर्मचाऱ्यांचा कार्यालयात गेल्यानंतर शोध घेणे सोपे ठरणार आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Latest Marathi News Updates : आचार्य देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

Whatsapp Threaded Reply : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी एका भन्नाट फीचरची एन्ट्री! हे नेमकं कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Khadakwasla Dam Update : खडकवासला धरण विसर्ग सध्या १४ हजार ५४७ क्यूसेक; २० हजार क्युसेक होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT