The Number Of Death Certificates Doubled In Ichalkaranji Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत मृत्यू दाखल्यांचे प्रमाण दुप्पट

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : गेल्या दोन महिन्यांत मृत्यू दाखल्यांचे प्रमाण दुप्पट झाले असल्याची माहिती पालिकेकडे असलेल्या जन्म-मृत्यू नोंद विभागाकडील आकडेवारीवरुन पुढे आले आहे. दोन महिन्यांत तब्बल 579 मृत्यू दाखल्यांची नोंद झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांची नोंदी पाहता ही सरासरी दुप्पट आहे. कोरोनाच्या महामारीमुळे या कालावधीत मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 

जन्म आणि मृत्यूची नोंद पालिकेकडे 21 दिवसांच्या आत करावी लागते. त्यानंतर दाखला दिला जातो. विविध कामांसाठी दोन्ही प्रकारच्या दाखल्यांचे महत्व आहे. हे दाखले असल्याशिवाय अनेक महत्त्वाची कामे मार्गी लागत नाहीत. पालिकेकडे जन्म-मृत्यू यांची नोंद करणाचा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे.

या विभागाकडे वर्षानुवर्षे या संदर्भातील कागदपत्रे जपून ठेवली जातात. रुग्णालयात जन्म अथवा मृत्यू झाल्यास रुग्णालयाकडून त्याची नोंद पालिकेकडे परस्पर केली जाते. घरामध्ये जन्म-मृत्यू झाल्यास मात्र पालिकेत जाउन त्यांची नोंद करावी लागते, मात्र आयजीएम रुग्णालयात जन्म-मृत्यू झाल्यास त्यांचे प्रमाणपत्र रुग्णालयातच दिले जाते. 

यापूर्वी सरासरी दीडशे मृत्यू दाखल्यांची नोंद होत होती, मात्र गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मात्र मृत्यू दाखल्यांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. या कालावधीत शहरात कोरोनाचा कहर झाला होता. दररोज सरासरी 50 ते 100 च्या दरम्यान कोरोना रुग्ण आढळून येत होते. कोरोना मृत होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. यासंदर्भातील मृत्यू दराची चर्चा राज्य पातळीपर्यंत झाली होती.

दुसरीकडे नॉन कोविड रुग्ण दगावण्याचे प्रमाणही त्याहून जास्त असल्याची माहिती आहे. आरोग्य यंत्रणेवर या कालावधीत मोठा ताण होता. अनेक नॉन कोविड रुग्णांना उपचार मिळणे मुश्‍कील झाले होते. त्यामुळे विविध आजारांनी ग्रस्त रुग्णही मोठ्या प्रमाणात मृत झाले आहेत. तुलनेने दोन महिन्यांत शहरात मृत होण्याचे प्रमाण हे सरासरी दुप्पट झाल्याचे मृत्यू दाखल्यांच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT