The Number Of TB Patients In The District Has Halved Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

काळजी कोरोनाची, फायदा टीबीला!

अवधूत पाटील

गडहिंग्लज : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेतली. मात्र, त्याचा फायदा क्षयरोगाला (टीबी) रोखण्यासाठीही झाला आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत क्षयरुग्ण निम्म्याने घटले आहेत. गतवर्षी तीन हजाराला पोहोचलेल्या आकड्याने यंदा कशीतरी हजारी पार केली आहे. क्षयरोगही कोरोनासारखाच संसर्गजन्य आहे. त्यामुळे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सचे पालन पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. 

क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. क्षयरोग्याच्या खोकण्या, शिंकण्यातून या आजाराच्या विषाणूंचा प्रसार होतो. रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना या आजाराचा संसर्ग झाल्यास अधिक धोका असतो. विशेषत: कुपोषित व्यक्ती, शुगर असणारे, किडनीच्या आजारांनी ग्रस्त, कॅन्सर, एचआयव्ही बाधितांकडे अतिजोखमीचे म्हणून पाहिले जाते. क्षयरोगाला रोखण्यासाठी शासनाकडून स्वतंत्र कार्यक्रम राबविला जात आहे. यामाध्यमातून रुग्णाच्या घरापर्यंत उपचाराच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. 

दरम्यान, मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. एकमेकांच्या संसर्गातून या आजाराचा प्रसार होतो. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा वापर अनिवार्य ठरला. नागरिकांकडून त्याची बऱ्यापैकी अंमलबजावणीही सुरू झाली.

यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झालीच पण, अप्रत्यक्षरीत्या क्षयरोगाचे रुग्ण कमी होण्यासही मदत झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात, तर संपर्कच कमी झाला होता. आता अनलॉक असले तरी मास्कचा वापर वाढला आहे. शिवाय सोशल डिस्टन्सचेही पालन केले जात आहे. यामुळे क्षयरोगाच्या संसर्गावरही मर्यादा आल्याचे दिसून येत आहे. 

क्षयरुग्णांना किट... 
जिल्हा क्षयरोग समितीची बैठक झाली होती. क्षयरुग्णांना मास्क, सॅनिटायझर आणि थुंकीच्या निर्जंतुकीकरणासाठी किट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. क्षयरुग्णापासून इतरांना आजाराचा संसर्ग होऊ नये, हा यामागील उद्देश होता. क्षयरुग्णांना या किटचे लवकरच वाटप केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

मास्कमुळे संसर्ग रोखण्यास मदत
टीबीच्या रुग्णांमध्ये घट आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तपासणी जरूर कमी झाली आहे. पण, मास्क वापराचा टीबी रूग्ण घटण्यासाठी अधिक फायदा झाला आहे. मास्कमुळे टीबीचा संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे. 
- डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा क्षयरोग अधिकारी, कोल्हापूर 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT