Obstacles In Alleys Of Jaysingpur Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

जयसिंगपुरात गल्लीबोळात "आडकाठ्या' 

सकाळवृत्तसेवा

जयसिंगपूर : लॉकडाउनमध्ये शहरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने हा परिसर कंटेंटन्मेंट झोनखाली आणला. या झोनशिवाय शहरातील गल्लीबोळात स्थानिकांनी काठ्या लावून रस्ते बंद केले आहेत. यामुळे लॉकडाउन शिथिल करूनही वाहनधारकांची गैरसोय होत आहे. कंटेंटन्मेंट झोन नेमका शंभर की तीनशे मीटर यावरूनही संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्याही मार्गावरून जाताना रस्त्यात आडकाठ्या असल्याने प्रशासनाने आता रस्ते खुले करून देण्याची मागणी वाहनधारकांतून व्यक्त होत आहे. 

शहराचा जवळपास निम्मा भाग आजही कंटेंटन्मेंट झोनखाली आहे. जे तीन रुग्ण आढळले ते इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन होते. कुटुंबीयांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कंटेंटन्मेंट झोन उठवावा अशी मागणी भागातील व्यापाऱ्यांकडून होत आहे. दोन-दोन महिने लॉकडाउनमुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. असे असताना प्रशासनाने परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने झोन उठवावा यासाठी व्यापारी, व्यावसायिकांच्या पालिकेत फेऱ्या वाढल्या आहेत. मात्र, तांत्रिक मुद्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आहे. 

कंटेंटन्मेंट झोनमुळे शहराच्या प्रमुख आणि अंतर्गत मार्गावर जवळपास सर्वच ठिकाणी रस्ते बंद केले आहेत. दहा दिवसांपासून कंटेंटन्मेंट झोनमुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. खाऱ्यापिण्याचे वांदे झाले असताना प्रशासनाने आमची स्थिती लक्षात घेऊन कंटेंटन्मेंट झोन उठवावा अशी मागणी होत आहे. प्रशासनाच्या पातळीवर आठ दिवसांत झोन उठवण्याचा विचार होता मात्र, अद्यापही तसे झाले नाही. लॉकडाउन शिथिल करूनही शहराच्या गल्लीबोळातील आडकठ्यांमुळे मात्र वाहनधारकांची गैरसोय होत आहे. 

दवाखाने, मेडिकलही बंद 
कंटेंटन्मेंट झोनमधील दवाखाने आणि मेडिकल सुरू होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना मात्र ते बंद केले याचे नेमके गणित डॉक्‍टर मंडळीच्या लक्षात येत नाही. अत्यावश्‍यक सेवा म्हणून सुरू ठेवणे गरजेचे असलेले दवाखाने आणि मेडिकलही बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. 

अर्ध्या शहरात गर्दी; अर्ध्यात शुकशुकाट 
कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या उत्तरेकडील भागातील व्यवसाय सकाळी सात ते सायंकाळी पाच यावेळेत सुरू आहेत. कंटेंटन्मेंट झोनखालील भागात शुकशुकाट आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT