SAKAL
कोल्हापूर

कलिवडे ग्रामस्थांचा जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा

आदर्श शिक्षक फेरमूल्यांकन प्रकरण, फेरमूल्यांकन थांबवण्याची मागणी

सकाळ डिजिटल टीम

चंदगड : जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांचे फेरमूल्यांकन करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी नवीन समिती गठीत केली असून, त्याला कलिवडे (ता. चंदगड) येथील ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यासंदर्भातील भूमिका मांडली. फेरमूल्यांकन थांबवावे अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या धोरणानुसार सभापती, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व अन्य सदस्यांच्या समितीने तालुक्यातील पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवलेल्या शिक्षकांचे मूल्यांकन केले. यामध्ये कलिवडे शाळेतील शिक्षक सतीश माने हे अव्वल ठरले आहेत. त्याच दरम्यान जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार यांनी मूल्यांकन योग्य पद्धतीने झाले नसल्याने फेरमूल्यांकन करावे अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली.

त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी नवीन समिती गठित केली आहे. मात्र हा आपल्या शाळेतील शिक्षकावर अन्याय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुतार यांनी आपल्या मर्जीतील शिक्षकाला पुरस्कार मिळावा म्हणून हा खटाटोप केला असल्याचा त्यांचा आरोप आहे. कलिवडे शाळा विविध शैक्षणिक उपक्रमात अग्रेसर आहे. शैक्षणिक उठाव, शंभर टक्के डिजिटल वर्ग यासह आयएसओ मानांकन प्राप्त शाळा आहे.

असे असताना तिथे राबणाऱ्या शिक्षकावर अन्याय करणे चुकीचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे फेरमूल्यांकन थांबवावे अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक कदम, शिवाजी गावडे, अशोक पाटील, निवृत्ती गावडे, विजय गावडे, लक्ष्मण पाटील, कृष्णा गुरव उपस्थित होते.

" मूल्यांकन योग्य पद्धतीने झाले नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्यामुळे मी शिक्षण विभागाकडे फेर मूल्यांकनाची मागणी केली. यामध्ये कोणावर अन्याय करण्याचा माझा हेतू नाही. कलिवडे येथे यापूर्वी शामराव पाटील यांना पुरस्कार मिळाला आहे. त्यावेळी मी सुद्धा त्यांना शिफारस पत्र दिले होते. माने यांच्या कामाविषयी माझ्या मनात आकस असण्याचे कारण नाही. तक्रारी आल्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने मी फेर मूल्यांकनाची मागणी केली." - अरुण सुतार, जि. प. सदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT