That old man death was not due to Corona kolhapur marathi news
That old man death was not due to Corona kolhapur marathi news 
कोल्हापूर

त्या वृद्धाचा मृत्यू कोरोना मुळे नाही झाला तर.....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सोशल मीडियावर कोरोना मुळे मृत्यू झाल्याच्या अफवा पसरली आहे मात्र या वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे नाहीतर निमोनिया मुळे झालेला आहे.  काल एका नागरिकाचा झालेला मृत्यू कोरोना मुळे झाला नसून तो निमोनिया मुळे झाला आहे ही माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे .त्यामुळे नागरिकांनी अशा अफवा वरती विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

टोप येथील ७५ वर्षीय रुग्ण  मधुमेहाने आजारी होते. काल त्यांना उपचारासाठी सीपीआरला दाखल केले होते. त्यांना न्युमोनिया झाल्याचे निष्पण झाले. त्यांची कोणतीही ट्रॕव्हल वा कोरोनो संसर्गिताशी संपर्काची कोणतीही पार्श्वभूमी नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा स्वॕब नमुना तपासणीसाठी पाठविला असून अद्याप त्याचा अहवाल अप्राप्त आहे. मधूमेह आणि न्युमोनियाने गंभीर असणाऱ्या या रुग्णावर उपचार सुरु असताना आज सकाळी ८-३० वा त्यांचा मृत्यू झाला  अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ बी सी केम्पी पाटील.यांनी दिली.

हेही वाचा- आदेशाचा भंग : आष्ट्यात पेट्रोलपंप मालकावर गुन्हा -
दरम्यान कोल्हापूर येथे दोन रुग्णांना कोरोना संसर्ग झाला आहे त्यामुळे नागरिकांच्या भीती निर्माण झाली आहे अशा वेळी कोरोना शी संबंधित कोणीही ही अफवा पसरू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे अन्यथा अशा व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT