Old man died in road accident in kolhapur 
कोल्हापूर

थांबलेली ट्रॉली ठरली त्यांच्यासाठी काळ

सकाळ वृत्तसेवा

थांबलेली ट्रॉली ठरली त्यांच्यासाठी काळ

म्हाकवे (कोल्हापूर) ः म्हाकवे-आप्पाचीवाडी रस्त्यावर मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात म्हाकवे (ता. कागल) येथील अशोक गणपती पाटील-पोवार (वय 60) ठार झाले. त्यांच्या पत्नी व नातू जखमी झाले. आप्पाचीवाडी येथील नातेवाइकांकडे एका कार्यक्रमाला जाताना ही घटना घडली.

अशोक पोवार-पाटील हे पत्नी विमल व नातू प्रेम दीपक पाटील (पोवार) यांच्यासह आप्पाचीवाडी येथे मोटारसायकल (एमएच 09 डीएस 9737) वरून रात्री जात होते. म्हाकवे-आप्पाचीवाडी मार्गावर कालव्याजवळील घसरणीला उसाची भरलेली ट्रॉली (केए 23 टी 4902) रस्त्याकडेला लावली होती. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशझोतामुळे ते थांबलेल्या ट्रॉलीवर आदळले. त्यांच्या चेहऱ्यासह शरीरात ऊस शिरले. त्यांच्या डोक्‍यालाही गंभीर मार बसला. तर जखमी पत्नी विमल व नातू प्रेम यांना कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.

कर्त्याचा नाहक बळी 
उसाची एक ट्रॉली भरून रस्त्याकडेला सोडून दुसरी ट्रॉली भरण्यासाठी मजूर गेले होते. रात्रीची वेळ असल्यामुळे मागील बाजूला रिफ्लेक्‍टरचे कापड बांधायला हवे होते. त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिकामी जागा आहे. तरीही चालकाने ट्रॉली रस्त्याकडेलाच लावली होती. यामुळे शेतकरी कुटुंबातील कर्त्याचा नाहक बळी गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'...म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अजरामर आहे'; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी महाराजांबद्दल काय सांगितलं?

IND vs SA 3rd T20I: १२,५,१२ धावा करणारा सूर्यकुमार यादव म्हणतो, मी आऊट ऑफ फॉर्म नाही, मी नेट्समध्ये चांगली फलंदाजी करतोय...

Ajit Pawar: तिजोरी ओसंडून वाहत नाही! सरसकट गोवंश अनुदानावरून अजित पवारांचा टोला

Latest Marathi News Live Update : राजगुरुमध्ये क्लास सुरु असतानाच विद्यार्थाचा गळा चिरला

Chh. Sambhajinagar: मांजाने कापले नाक, डोळ्यांची नस; पडले तब्बल ४० टाके, बिडकीन येथे दुचाकीस्वार गंभीर

SCROLL FOR NEXT