old man viral sms on whats app hospital due to sanitizer bill in kolhapur ichalkaranji 
कोल्हापूर

दुर्दैव : जीवापेक्षा 50 रुपयांच्या सॅनिटाईझरची जास्त चर्चा

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : अत्यवस्थ रुग्णाचे जीव वाचवण्याच्या आनंदापेक्षा त्या रुग्णालयाने पन्नास रुपये सॅनिटाईझरच बिल लावल्याचे दुःख करत व्हाट्सअपवर मेसेज व्हायरल केल्याबद्दल वैद्यकीय व्यवसायात खंत व्यक्त केली जात आहे. उच्चभ्रू  वर्गातील रुग्णाच्या त्या नातेवाईकांनी घटनेचे गांभीर्य समजावून न घेता केवळ बदनामीसाठी केलेली ही पोस्ट आता चर्चेची ठरली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी,  एक 70 वर्षाचा व्यक्ती अस्वस्थ वाटू लागल्याने शेजारच्या दवाखान्यात गेले. डॉक्टर त्याला तात्काळ  तपासले. त्याचे ठोके 190 लागल्यामूळे ते रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्ण सिरीयस असल्याची कल्पना घेऊन अतिदक्षता विभागामध्ये ऍडमिट होणाचा सल्ला दिला. नातेवाईक मोठ्या शहरातील  हॉस्पिटलमध्ये जाण्याचं ठरवत होते पण परिस्थिती गंभीर झाल्यामुळे गावातीलच एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टर तपासणी करत असतानाच हृदय बंद  त्यामूळे अतिदक्षता विभागामध्येमध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करून छातीला शॉक दिल्यानंतर हृदय चालू झाले. इंजेक्शनचा वापर करून ब्लडप्रेशर कंट्रोल केले. योग्य ते उपचार करून रुग्णाला पूर्णपणे धोक्याबाहेर काढले. सातव्या दिवशी रुग्ण पूर्ण बरा होऊन डिस्चार्ज  घेऊन घरी गेले.

दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाशी संबंधित व्यक्तीने व्हाट्सअपवर पोस्ट टाकून  हॉस्पिटल बिलामध्ये सॅनिटीझरचे 50 रुपये लावले व आम्हाला येता-जाता मागितल्या शिवाय हातावर सॅनिटीझर देत नाहीत’,अशी पोस्ट केली. आपल्या नातेवाईकाचे जीव वाचल्याचे आनंदापेक्षा पन्नास रुपयाचे निर्जंतुकीकरणचे लावलेल्या बिलाचा गाजावाजा करण्याच्या प्रवृत्तीबाबत वैद्यकीय क्षेत्राने खंत व्यक्त केली आहे. 

याबाबत अधिक माहिती घेतली असता मिळालेली वस्तुस्थिती अशी, कोणतेही  रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये दाखल केल्यानंतर औषधे लिहून देताना रुग्णाला संसर्ग होऊ नये म्हणून सॅनिटाईझर लिहून देतात. 

ज्याचा वापर गंभीर रुग्णाला हात लावण्यापूर्वी हॉस्पीटलमधील डॉक्टर, स्टाफ व रुग्णाचे नातेवाईक हात निरजंतुक करण्यासाठी वापरतात.

 पण सध्या सॅनिटाईझरची उपल्बधता कमी असल्यामुळे लोक गरज नसताना मोठी बाटली आणू लागले. त्यावर उपाय म्हणून सॅनिटीझर लिहून द्यायचे बंद करून हॉस्पिटलने मोठी बाटली खरेदी करून त्यातून वापर सुरू केला व बीलामध्ये 50 रुपये लावले. बहुदा सर्व नातेवाईकांना त्याची कल्पना पण दिली जात असल्याचे सांगण्यात आले. 

हे पण वाचा -  गावठी मिळणेही बनले कठीण : तळीरामांची झाली गोची                                                  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : अवैध कॉलसेंटरचा भांडाफोड, 93 जणांविरुद्ध गुन्हा

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT