Old plastic bags taken out by blind professionals 
कोल्हापूर

अन्‌ व्यावसायिकांनी बाहेर काढल्या जुन्या प्लास्टिक पिशव्या 

सकाळवृत्तसेवा

जयसिंगपूर : लॉकडाउन काळात बंदी असणाऱ्या प्लास्टिकचा वापर शहरात खुलेआम सुरू झाला आहे. शासनाने राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला खरा, पण प्रशासन कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याने कारवाईअभावी शहरात प्लास्टिक वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरात प्लास्टिक बंदी केवळ नाममात्र असल्याचे पाहायला मिळत आहे. 

प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. राज्यात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे; पण आता राज्य शासनाने सरसकट प्लास्टिक बंदीचा निर्णय झाला. त्यासाठी कायद्यात सुधारणा, कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल, विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईची तरतूद, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तीन ते सहा महिने शिक्षा आणि परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. 

यासंदर्भात मागील सरकारच्या काळात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही प्लास्टिकबंदीची घोषणा केली होती. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. कारवाईच्या धास्तीने अनेक व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशव्या नकोच, अशी भूमिका घेऊन पर्यायी कागदी व कापडी पिशव्यांचा पर्याय उभा केला. शहरातील अनेक दुकानांमध्ये विक्रेत्यांनी कागदी आणि कापडी पिशव्या विक्री सुरू केली होती.

विकत घेतल्या जाणाऱ्या मालाबरोबर पिशवीचे अतिरिक्त शुल्कदेखील आकारले जात होते. त्यामुळे ग्राहकांकडूनच घरातून पिशव्या आणण्यावर भर दिला जात होता. लॉकडाउन काळात शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वारेमाप वापर सुरू झाला आहे. प्रशासन कोरोनाच्या कामात व्यस्त असताना अनेक व्यावसायिकांकडे असणाऱ्या जुन्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. प्रशासनाने छापासत्राचा वापर करून अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची गरज आहे. 

दुकानांवर छापे... 
शासनाने प्लास्टिकला बंदी घातल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने काही वेळा प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानांवर छापे टाकून कारवाई केली आहे. दंडाची आकारणी करून कारवाई थांबवली. केवळ दंडासाठी कारवाई न करता कारवाईत सातत्य ठेवले नाहीच शिवाय कायद्याचा धाकही दाखविला नसल्याने आज शहरात प्लास्टिकचा वापर खुलेआम होताना दिसत आहे. 

प्रशासनाने वर्षभरात पाच-सहा वेळा कारवाई करून सुमारे 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्लास्टिक वापराला आळा घालण्यासाठी प्रबोधनही केले आहे. यापुढे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली जाईल. 
- संदीप कांबळे, आरोग्य निरीक्षक, जयसिंगपूर पालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT