one and a half trolleys of dead fish in panchganga river 
कोल्हापूर

बाप रे! पंचगंगेतून काढले दीड ट्रॉल्या मृत मासे 

सकाळ वृत्तसेवा

शिरोळ - पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्‍नी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल प्रशासनाच्या बैठकीवर बहिष्कार टाकून नदी पात्रात उतरून अधिकाऱ्यांना नदी काठावरच बैठक घेण्यास भाग पाडून प्रदूषणप्रश्‍नी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उपविभागीय अधिकारी विकास खरात यांनी बैठकीत दिलेल्या आदेशानुसार आज पंचगंगा नदीपात्रातील मृत मासे संकलित करण्याचे काम इचलकरंजी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाकडून सुरू झाले. 

शिरोळ व तेरवाड बंधारा दरम्यान पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच पडल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे बुधवारी उपविभागीय अधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात खडाजंगी बैठक झाली. बैठकीत मृत मासे पात्रातून बाहेर काढून विल्हेवाट लावण्याचे आदेश खरात यांनी दिले होते. 
या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता बाजीराव कांबळे यांनी पंधरा कर्मचाऱ्यांसह मृत मासे बाहेर काढण्यास सुरवात केली. आज पहिल्या दिवशी सुमारे दीड ट्रॉल्या मृत माशांची विल्हेवाट लावली. 

इचलकरंजी नगरपालिकेकडील यांत्रिक बोट आज सायंकाळी दुरुस्त केली आहे. शुक्रवारपासून मृत मासे बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. मृत मासे इचलकरंजी नगरपालिकेच्या मालकीच्या मैल खड्ड्यात गाडले जाणार आहेत.   

- बाजीराव कांबळे, शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Changes: गणेशोत्सवात पुण्यात मोठा वाहतूक बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाला मुहूर्त, सात खासगी मिळकतींचा प्रश्न मार्गी; १० वर्षांचा तिढा सुटला

iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

Marathi News Live Updates :गौतमी पाटलांविरोधात भाजप नेत्या आक्रमक, अश्लील हावभाव केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार

क्रिकेटच्या कारभारात मोठा बदल होणार? सर्वोच्च न्यायालयाने BCCIसमोर उपस्थित केला ‘हा’ सवाल; १२ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत

SCROLL FOR NEXT