One arrested while paying bribe to MSEDCL office in ichalkaranji 
कोल्हापूर

महावितरणच्या अधिकार्‍यास लाच देताना एक जण जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यास एक हजारांची लाच देण्याचा प्रयत्न करणार्‍या एकास शहापूर येथे आज रंगेहात पकडले. संभाजी तुकाराम बसरवाडकर (वय 35, रा. सावली सोसायटी) असे त्याचे नाव आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांने ही कारवाई केली.

घरगुती वीजेचा वाणिज्य करणासाठी वापर केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास न पाठविण्यासाठी लाच देतांना ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


या प्रकरणातील तक्रारदार हे महावितरण कंपनीच्या शहापूर उप विभागात प्रभारी सहाय्यक अभियंता आहेत. सात दिवसांपूर्वी बसरवाडकर याला पाणी फिल्टर व्यवसायासाठी वीज मिटर कनेक्शन देण्यात आले होते. मात्र बसरवाडकर यांने अनधिकृतपणे घरगुती वीज कनेक्शनवरच पाणी फिल्टर व्यवसाय सुरु ठेवला होता. ही बाब महावितरण कंपनीच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबत दंडात्मक कारवाईचा अहवाल तक्रारदार हे वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करणार होते. हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू नये, यासाठी बसरवाडकर यांने तक्राकदार अधिकार्‍यास वारंवार लाच देण्याचा प्रयत्न केला.  याबाबत तक्रारदार यांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. 

या तक्रारीची आज सकाळी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आज शहापूर येथील महावितरण कार्यालयात पथकांने सापळा रचला. यावेळी 1 हजारांची लाच देतांना बसरवाडकर याला पथकांने रंगेहात पकडले. या प्रकरणी बसरवाडकर याच्यावर शहापूर पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा कारवाई पोलीस उप अधिक्षक सुजय घाटगे, पोलीस निरिक्षक गुरुदत्त मोरे, पोलीस अंमलदार सलीम मकानदार, अविनाश सागर, संजय संकपाळ, सिमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी भाग घेतला.


नागरिकांना आवाहन

लाच घेणे जसा गुन्हा आहे, तसा लाच देेणे देखील गुन्हा आहे. त्या अनुषंगाने कांही तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT