one boy drowned and died today in kolhapur shingnapur 
कोल्हापूर

पतीच्या मृत्यूनंतर एकलुत्या एका मुलावर नियतीचा घाला; यशराजची रंगपंचमीची अंघोळ ठरली अखेरची

सकाळ वृत्तसेवा

कुडित्रे (कोल्हापूर) : चंबुखडी शिंगणापुर (ता. करवीर) येथे रंगपंचमी खेळुन पोहायला गेलेल्या एका विद्यार्थ्याचा खणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर एका विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आले. यशराज राजू माळी (वय 17) असे मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली दुपारपर्यंत घटनेची नोंद करवीर पोलिसांत करण्याचे काम सुरु होते आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, यशराज माळी हा आपली आई योगिता माळी (रा. सातारा) येथील असून गेली अनेक वर्षे शिंगणापूर येथील मामा पवन कुमार सावंत यांच्याकडे राहतात. यशराज यांच्या वडिलांचा चार वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. आज रंगपंचमी खेळल्यानंतर 11 वाजता मसोबा मंदिरामागील खणीत यशराज माळी व मारुती कस्तुरे (वय 17) अन्य मित्रांसोबत पोहायला गेले होते. यशराज आणि मारुती या दोघांना पोहता येत नव्हते. तरीही दोघांनी खाणीत उडी मारली. यावेळी दोघे पाण्यात बुडताना पाहून काठावर बसलेल्या अभिषेक खेतल याने दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी टाकली. सुरुवातीला मारुती कस्तुरे याला अभिषेकने बाहेर काढले. दरम्यान यशराज तळात गेल्याने अभिषेकने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र यशराज सापडला नाही.

या घटनेची माहिती नागरिकांना समजतात अग्निशामक दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापकांना सांगण्यात आले. त्यानंतर गाळात अडकलेल्या यशराजला बाहेर काढण्यात आले. त्याला उपचारासाठी सीपीआरला पाठवण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आई योगिता यांना यशराज हा एकुलता एक मुलगा होता. बोलक्या स्वभावाच्या दहावीला असणाऱ्या यशराजच्या मृत्युमुळे गणेश कॉलनीत हळहळ व्यक्त होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT