one business man fraud with kolhapur urban bank rupees one and half crore 
कोल्हापूर

कोल्हापूर अर्बन बॅंकेची दीड कोटीची फसवणूक ; तिघांविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

उजळाईवाडी (कोल्हापूर) : उद्योग उभारणे व मशिनरी खरेदीची बोगस कोटेशन सादर करून कोल्हापूर अर्बन बॅंक गांधीनगर शाखेची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बाळासो चंद्राप्पा पाटील, आनंदा बाळासो पाटील (दोघे रा. कागले माळवाडी, गोकुळ शिरगाव ता. करवीर ) व भरत कुमार जैन प्रोप्रा. मे. भाग्यलक्ष्मी इंडस्ट्रिज (रा. ३६१/८ मेन, सेकंड स्टेज, पेंनाई इंडस्ट्रियल इस्टेट, बेंगलोर कर्नाटक ) अशी गुन्हा दाखल झोलेल्यांची नावे आहेत.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संशयित बाळासो पाटील व आनंदा पाटील यांचा गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये कारखाना आहे. या कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी त्यांनी कोल्हापूर अर्बन बॅंकेच्या गांधीनगर शाखेकडे कर्जाचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावामध्ये उद्योगाचे  विस्तारीकरण करण्यासाठी नवीन सीएनसी व व्हीसीएमसी मशिनची आवश्‍यकता असून, सदर मशिनचे कोटेशन भरत कुमार जैन यांचेकडून घेऊन ते एप्रिल २०१९ मध्ये बॅंकेला सादर केले होते. त्यावर बॅंकेने मशिनरी खरेदी करण्यासाठी संशयितांना दीड कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, परंतु सदर कर्जाच्या रकमेचा विनियोग मशिनरी खरेदी करण्यासाठी न करता वैयक्तिक कारणासाठी करीत पैशाचा अपहार केल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व  शाखाधिकारी गौरव पाटील यांनी चौकशी केली असता कोटेशनप्रमाणे कोणतीही नवी मशिनरी त्यांच्या उद्योगाच्या ठिकाणी आढळून आली नाही. यावरून सादर केलेली कोटेशन्स खोटी व बनावट असल्याचे समोर आले. यामध्ये भरतकुमार जैन यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण करीत बाळासो पाटील, आनंदा पाटील व भरतकुमार जैन या तिघांविरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यांमध्ये शाखाधिकारी गौरव विजय पाटील (रा. गुलाब गल्ली, मंगळवार पेठ कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण हे तपास करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्ह्याचे सहकार सत्ता केंद्र,‘गोकुळ’च्या निवडणुकीचे बिगुल पुढील आठवड्यात; अंतर्गत हालचालींना वेग

Girish Mahajan : 'उरलासुरला पक्ष वाचवायचा असेल तर राऊतांना बाजूला सारा'; महाजनांचा उद्धव ठाकरेंना थेट सल्ला

Latest Marathi News Live Update : पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एस टी बसच्या फेऱ्या रद्द

Gold Extraction from SIM Card : पठ्ठ्याने जुन्या सिमकार्डसमधून काढले २६ लाखांचे सोने, व्हिडिओ केला शेअर, लोक म्हणाले- हा तर आधुनिक किमयागार

E-KYC Issue : लाडक्या बहिणींच्या १.४ लाख ई-केवायसीत गोंधळ; अंगणवाडी सेविकांकडे पडताळणीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT