one case corona positive in sangli walwa 
कोल्हापूर

पुण्याला गेला अन् कोरोना पाॅझिटिव्ह होऊन आला 

सकाळ वृत्तसेवा

नेर्ले (सांगली) - केदारवाडी (ता. वाळवा) येथील एक युवक "एका दिवसासाठी पुण्याला गेला" आणि कोरोना पॉजिटिव्ह झाल्याची घटना घडली आहे. हा युवक शेजारील  साखरपुढ्यातही सहभागी झाला असल्याचे समजते. त्याच्या सोबत किर्लोस्करवाडी (ता. कराड) येथील एका युवतीसह गावातील एक युवती, गाडी चालक व संबंधित कुटुंब यांचे स्वॅब घेण्यात येनार आहेत. त्यांना इस्लामपूर येथे संस्थात्मक कोरंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे केदारवाडी त घबराट निर्माण झाली आहे. 


केदारवाडी हे १२०० लोकसंख्या असणारे गाव आहे. भाटवाडीच्या जावया नंतर  आता महामार्गालगत असणाऱ्या या गावातील पुण्यात शिक्षण घेणाऱ्या युवकाला कोरोणा झाला आहे. ३० तारखेला आपले साहित्य आणायला हा युवक, दोन युवती आणि चालक असे पुण्याला गेले होते. या युवकास चार तारखेला ताप आल्याने इस्लामपूर येथे त्याला अलगिकरन कक्षात ठेवण्यात आले होते. त्याचा स्व्ॅब पाठवल्यानंतर आज त्याचा अहवाल पॉजिटिव्ह आला. त्याचा अहवाल प्राप्त होताच वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे यांनी धाव घेतली. सध्या केदारवाडी गाव सील करन्यात आले आहे. तो परिसर कंटेनमेंट झोनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. अशा सेविका यांच्या माध्यमातून सर्वे सुरू करण्यात आला आहे. ग्रामपंचायतच्या वातीने तो भाग निर्जंतुक केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT