one corona case who travels hyderabad to kolhapur in aeroplane
one corona case who travels hyderabad to kolhapur in aeroplane 
कोल्हापूर

ब्रेकिंग : विमानातून आलेला 'तो' प्रवासी निघाला कोरोना पॉझिटीव्ह 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - दिल्ली ते हैदराबाद आणि हैदराबाद ते कोल्हापूर असा विमान प्रवास करून आलेला विमानतळावरील ठेकेदाराकडील कर्मचारीच कोरोना पॉझिटीव्ह निघाला आहे. 
कोल्हापूर विमानतळावर काल सकाळी हैदराबादवरून विमानातून एकूण 17 प्रवासी आले होते. यामध्ये कोल्हापुरातील 11 तर सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा प्रवासी होते. 

कोल्हापुरातील प्रवाशांना डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांचे स्वॅब घेऊन त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले होते. आज यापैकी एकाचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे. तो प्रवासी मुळचा कानपूरचा आहे. कोल्हापूर विमानतळाकडील कर्मचारी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडे तो कामगार म्हणून काम करत होता. तो हैदराबादहून आल्यामुळे त्याला तातडीने रुजू करून घेण्यास विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी नकार दिला. त्यामुळे तो अद्याप रूजू झालेला नाही. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, त्याचा स्वॅब पॉझिटीव्ह आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्या विमानातून आलेल्या इतरांची माहिती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. मात्र जो पॉझिटीव्ह आहे त्याच्या मागील आणि पुढील सीटवर विमानात कोणीही बसलेले नसल्याची माहिती कटारिया यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

जिल्ह्यात आज आणखी सहा जणांना लागण 

जिल्ह्यात आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आता पाॅझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये दिड वर्षाच्या एका मुलीसह आठ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. या रूग्णांपैकी आजऱ्यातील तीन,  शाहूवाडीतील दोन तर पन्हाळ्यातील एकाचा समावेश आहे.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Mumbai Election: सोमवारी ठाकरे गटाच्या पोलिंग एजेंटचा टॉयलेटमध्ये मृत्यू, तर निवडणूक अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Kalyani Nagar Accident : पुणेकरांच्या तीव्र प्रतिक्रिया...फक्त सामान्य नागरिकांनाच कायदे लागू आहेत का?

Latest Marathi News Live Update: 300 ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती

SCROLL FOR NEXT