कोल्हापूर

कोरोना लढाईसाठी  "देवस्थान'कडून एक कोटी 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विनंतीला मान देऊन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे जिल्ह्यातील कोरोनाविरोधातील लढाईसाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

यापूर्वीही समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे दीड कोटी रुपये कोरोना लढाईसाठी दिले आहेत. सुमारे पन्नास लाखांची रक्कम गरजूंना विविध साहित्यासाठी खर्च केले आहेत. त्याशिवाय आणखी एक कोटीचा निधी आता समिती जिल्हा प्रशासनाकडे देणार आहे. याचा निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत झाला. 
दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार आदींचा बैठकीत सहभागी होता. 
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून यापूर्वीच कोरोना लढाईसाठी दोन कोटींचा खर्च झाला आहे. सध्या जिल्ह्यात रोज दीडशे ते दोनशे रुग्ण नव्याने वाढत आहेत. त्यामुळे या सर्वांवर उपचार करण्यासाठी तातडीने औषधे आणि इतर साहित्य खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठी समितीकडून एक कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. यापूर्वी दोन कोटी रुपयांचा खर्च झाल्याने आणखी एक कोटी रुपये द्यायचे असल्यास विधी व न्याय विभागाची मान्यता घेणे आवश्‍यक आहे, असे यावेळी श्री. जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी त्याची जबाबदारी आम्ही घेऊ, अशी ग्वाही दिली. त्यामुळे दोन दिवसांत हा निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द होईल. 
दरम्यान, देवस्थान समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह कार्यक्षेत्रातील सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रत्येकी पाच लाखांचा निधी यापूर्वी दिला आहे. लॉकडाउनमुळे हातावरचे पोट असलेल्या लोकांची उपासमार सुरू झाल्याने अशा लोकांसाठी सुमारे बावीस लाखांच्या रकमेतून जीवनावश्‍यक साहित्याच्या किटचे वितरण केले आहे. त्यात जोतिबा मंदिर परिसरातील विक्रेते, रिक्षा व्यावसायिक, नाभिक समाज, वारांगना, घरेलू मोलकरीण आदींचा समावेश आहे. 


कोरोनाविरोधातील लढाईसाठी देवस्थान समिती मदत म्हणून नव्हे तर कर्तव्य या भावनेतून पहिल्यापासून सक्रिय आहे. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून समितीतर्फे आणखी एक कोटीचा निधी दिला जाणार आहे. यापूर्वी दोन कोटींचा निधी समितीने जिल्ह्यासह राज्यातील कोरोना लढाईसाठीच खर्च केला आहे. 
- महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोनालिसा अल्पवयीन? व्हायरल गर्लच्या जन्मतारखेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

IND vs WI 3rd ODI: भारतीय संघात अचानक बदल, CSK च्या स्टार खेळाडूला बोलावलं; तिसऱ्या वन डेत Playing XI मध्ये बदल निश्चित

रस्त्याने चालताना अघटित घडलं! बंद गोदामाच्या बाल्कनीचा भाग थेट पादचाऱ्यावर कोसळला, साकीनाक्यातील थरारक घटना CCTVत कैद

Googleचा नवा AI ‘Gemini 4 Argon’ लॉन्च; कोडिंगपासून सायबरसुरक्षेपर्यंत करणार मदत, जाणून घ्या किंमत

ROHIT SHARMA: ‘पुन्हा तीच भावना अनुभवायची आहे...’; २०२७ वर्ल्ड कपआधी रोहित शर्माचा मोठा खुलासा, शुबमन गिलच्या कॅप्टन्सीवरही बोलला

SCROLL FOR NEXT