One crore fraud the lure of profits sanitizer mask business sakal
कोल्हापूर

व्यावसायिकाला एक कोटीचा गंडा ; सॅनिटायझर, मास्क व्यवसायात नफ्याचे आमिष

सॅनिटायझर, हँडग्लोज, मास्कच्या व्यवसायात मोठ्या नफा मिळवून देण्याचे आमिष

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सॅनिटायझर, हँडग्लोज, मास्कच्या व्यवसायात मोठ्या नफा मिळवून देण्याचे आमिषाने एक कोटीहून अधिकचा गंडा घातल्याप्रकरणी पिता-पुत्रासह चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. रोहित हरिष नागदेव, राहुल हरिष नागदेव, हरिष बलीराम नागदेव (तिघे रा. महालक्ष्मी पार्क सोसायटी, हॉकी स्टेडियम परिसर) आणि शाम पल्लोद अशी संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, राजारामपुरी परिसरात संतोष मोहन पोवार राहतात. त्यांचा मोटार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. जिलानी मुल्ला आणि समीर भालदार त्यांचे व्यावसायिक सहकारी आहेत. त्यांचे शाहूपुरी येथे कार्यालयही आहे. संशयित रोहित त्याचा भाऊ राहुल, वडील हरिष नागदेव आणि शाम पल्लोद मोटार खरेदी करण्याच्या बहाण्याने कार्यालयात गेले. येथे त्यांनी पोवार व त्यांच्या सहकारी मित्रांची ओळख करून घेतली. संशयितांनी कोरोना संकटामुळे त्यांच्या व्यवसायात आलेल्या मंदीचा अंदाज घेतला. त्यांनी पोवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सॅनिटायझर, हँडग्लोज, मास्क, पीपीई किट, ऑक्सिमीटर, फेस शिल्ड या वस्तूंची ऑर्डर घेऊन त्याचा व्यवसाय करून मोठा नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवले.

पोवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरुवातीला त्यांना प्रत्येकी दीड लाखप्रमाणे साडेचार लाख रुपये दिले. संशयितांनी त्याच पैशांतून व्यवसायात नफा झाल्याचे भासवून परतावा दिला. त्यानंतर संशयितांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे सांगितले. त्यांच्याकडून त्यांनी वेळोवेळी अशी एक कोटी पाच लाख १५ हजार ५०० रुपये घेतले. ही रक्कम व्यवसायात न गुंतवता ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केली. हा प्रकार ३ मे २०२१ ते २ फेब्रुवारी २०२२ अखेर घडल्याची फिर्याद पोवार यांनी दिली. त्यानुसार चौघा संशियतांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सायंकाळी संशयित राहुल आणि हरिष नागदेवला अटक झाली. दरम्यान, संशयित रोहित बेपत्ता आहे. याबाबतची तक्रारही जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. याबाबतची खातरजमा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

SCROLL FOR NEXT