one crore rupees help from West Maharashtra Devasthan Samiti for treatment on Corona patient 
कोल्हापूर

'या' मंत्र्यांनी विनंती केली म्हणुन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून कोरोना उपचारासाठी आणखीन एक कोटी रुपये...

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विनंतीला मान देऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून आणखीन एक कोटी रुपये कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी दिले जाणार आहेत. यापूर्वीही समितीने दोन कोटी रुपये याच कारणासाठी दिले आहेत, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कडून यापूर्वीच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन कोटी रुपये दिले आहेत. मात्र सध्या जिल्ह्यात रोज दीड-दोनशे रुग्ण नव्याने वाढत आहेत त्यामुळे या सर्वांवर उपचार करण्यासाठी तातडीने औषधे आणि इतर साहित्य खरेदी करण्याची आवश्यकता आहे, यासाठी देवस्थान कडून एक कोटी रुपये आणखीन मिळावे, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यावर काही तांत्रिक मुद्दे अध्यक्ष जाधव यांनी उपस्थित केले. या पूर्वी दोन कोटी रुपये दिल्याने आणखीन 1 कोटी रुपये द्यायचे असल्यास विधी व न्याय विभागाची ची मान्यता घेणे आवश्यक आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी त्याची जबाबदारी आम्ही घेऊ हा निधी सरकारसाठी आपण देत आहात, कोरोना महामारीतील रुग्णांसाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे. असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

विधी व न्याय विभागाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी दोन्ही मंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी घेतली आहे, त्यामुळे दोन दिवसात ही रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द केली जाईल, असेही अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यांची व्यवस्था करण्यासाठी निधी अपुरा पडत असल्याने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त  मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या उपस्थित बैठक सुरू होती.या ठिकाणी देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव व इतर पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावून घेतले. मुंबईत असलेले दोन्ही मंत्री यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, या नंतर एक कोटी रुपये देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रामनवमीची मिरवणूक अन् खुनशी राग! पुण्यात भरदिवसा तरुणाला संपवण्याचा प्रयत्न; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

गायत्रीच्या केळवणाची बातचं न्यारी! फिश फ्राय, मोदक, पुरणपोळी आणि बरंच काही, Video शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : ज्योतिबा भाविकांना मारहाण प्रकरणी परिते गाव आणि व्यापार पेठ बंद

Ashok Kharat Case : नीलम गोऱ्हे देखील अशोक खरातकडे भविष्य पाहायला जायच्या; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ

SCROLL FOR NEXT