one dead in accident at belgaum 
कोल्हापूर

दुर्दैव ; नव्या दुचाकीचाच झाला अपघात ; तरूणाचा जागीच मृत्यू 

अमृत वेताळ

बेळगाव - केवळ आठ दिवसापूर्वी घेतलेल्या यामहा दुचाकीला अपघात होऊन तरुण जागीच ठार झाला. हा अपघात बेळगाव संकेश्वर रोडवरील सुतगट्टी नजिक गुरुवारी (ता.30) रात्री घडला असून सिद्राय मनेपा नाईक (वय 24, रा. काकती) असे मयताचे नाव आहे. अपघाची नोंद काकती पोलीस ठाण्यात झाली आहे.

या बाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, सिद्राय हा ड्रायव्हिंगचे काम करत होता. गेल्या आठ दिवसापूर्वीच त्याने एम एच 01 एच 8879 क्रमांकाची यामहा दुचाकी घेतली होती. त्यांच्या नात्यातील ऐकला आराम नसल्याने तो काल सायंकाळी पाचच्या सुमारास घरी सांगून दुचाकीवरून गेला होता. सिद्राय संकेश्वरकडून बेळगावकडे येत असताना रात्रीच्या सुमारास बेळगावकडून बिरणहोळकडे जाणाऱ्या भरधाव मालवाहू 407 टेंपोने वळण घेताना समोरून येणाऱ्या दुचाकीला चिरडल्याने सिद्राय जागीच ठार झाला. अपघातानंतर टेम्पो चालकाने टेम्पो तेथेच सोडून पलायन केले.

अपघाताची माहिती समजताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी आज काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हल्लूर अधिक तपास करीत आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT