one dead in accident kolhapur bidri 
कोल्हापूर

कोल्हापुरातील बिद्री येथे ट्रॉलीला पाठीमागून धडक बसल्याने एक जण ठार  

दत्ता वारके

बिद्री : रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिद्री साखर कारखान्याजवळ ही घटना घडली. संभाजी ऊर्फ बाबुराव ज्ञानदेव साठे ( वय ६५ ) असे मृताचे नाव असून ते दूधसाखर विद्यानिकेतनचे निवृत्त कर्मचारी होते.


याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, संभाजी साठे यांच्या मुधाळ तिट्टानजीक असलेल्या कालव्याच्या शेजारील शेतात ऊसतोड सुरु आहे. त्यासाठी श्री. साठे हे शेताकडे आपल्या मोटरसायकल ( क्र. एमएच ०९ - डी क्यू ९०५७ ) वरुन चालले होते. बिद्री साखर कारखान्यापासून पाचशे मीटर अंतरावर रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला त्यांच्या मोटरसायकलची पाठीमागून जोरात धडक बसली. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते जागीच गतप्राण झाले.

स्थानिकांनी त्यांना रुगणवाहिकेतून मुरगूड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतू त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. घटनेची माहिती समजताच मुरगूड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी त्यांच्यावर बोरवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  

संभाजी साठे हे बिद्रीच्या दूधसाखर विद्यानिकेतन या शाळेतून शिपाई म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. अधिक तपास सपोनि विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत गोजारे करत आहेत. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! ३५ वर्षांच्या रॅपरने केला ४ वेळा पंतप्रधान राहिलेल्या के.पी. ओलींचा पराभव, बालेंद्र शाह इतिहास रचणार

Latest Marathi News Live Update : अंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिर परिसरावर पालिकेची कडक कारवाई

Pune Accident: पुण्यात अपघातांची मालिका वेगवेगळ्या अपघातांत महिलेसह तीन जणांचा मृत्यू

UPSC Result: ट्रक ड्रायव्हरच्या लेकीची उत्तुंग भरारी! उत्तराखंडच्या फातिमाने यूपीएससीत मिळवली ७०८ वी रँक

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील महत्त्वाचा आरोपी जेलबाहेर येणार; कोर्टाकडून विशेष परवानगी, नेमकं कारण काय ?

SCROLL FOR NEXT