one golden jewellery found in raigad under the observation of chhatrapati sambhaji raje in kolhapur 
कोल्हापूर

रायगडवर सापडली सोन्याची बांगडी; संभाजीराजेंकडून पुरातत्त्व विभागाचे कौतुक

संदीप खांडेकर

कोल्हापूर : दुर्गराज रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या डाव्या बाजूच्या वाड्यात सुरू असलेल्या उत्खननात गुरुवारी (१) सोन्याची बांगडी सापडली. गडावर इतका मोठा सोन्याचा अलंकार पहिल्यांदाच सापडला आहे. यापूर्वी तुटलेली सोन्याची साखळी सापडली असून, सुबक नक्षीकाम असलेल्या बांगडी‌ने इतिहास संशोधक, अभ्यासक व शिवभक्तांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी गडास भेट देऊन बांगडीसह अन्य वस्तूंची पाहणी करत, पुरातत्त्व विभागाने केलेल्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.

खासदार संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्त्व खात्यातर्फे गडावर उत्खनन सुरू आहे. मूर्ती, नाणी, तोफगोळे, बंदुकीच्या गोळ्या, भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौले अशा वस्तू मिळालेल्या आहेत. मात्र, गुरुवारी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याची बांगडी मिळाली. संभाजीराजे यांनी तत्काळ गडाला भेट देऊन या बांगडीची पाहणी केली. तसेच उत्खननात सापडलेल्या दिव्याची माहिती घेतली.

गडावर बांगडी सापडल्याची बातमी पंचक्रोशीसह इतिहास अभ्यासकांत पसरताच त्यांच्यातील उत्सुकता दाटून आली. याबाबत रायगड विकास प्राधिकरणाचे कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्ट वरुण भामरे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, 'उत्खननामध्ये ही सोन्याची बांगडी मिळाली असून, तिचे वजन केलेले नाही. पुरातत्व खात्याकडून माहिती मिळाल्यावर त्याबाबत अधिक सांगता येईल.'

"उत्खननात मिळालेल्या या वस्तूंमुळे तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. गडावर उत्खननास योग्य अशा जवळपास ३५० साईटस् आहेत. याठिकाणी देखील उत्खनन झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी उजेडात येतील. सध्या अत्यंत दुर्मिळ असलेले शिवरायांचे 'होन' हे सोन्याचे नाणे देखील आपल्याला उत्खननात निश्चितच मिळेल, असा मला विश्वास आहे."

- खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT