One Hundred Percent Result Of 27 Out Of 32 Schools In Ajara Taluka Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

काैतुकच...! आजरा तालुक्यातील  32 पैकी 27 शाळांचा शंभर टक्के निकाल... तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य

रणजित कालेकर

आजरा : आजरा तालुक्‍यातील शाळांनी दहावी परीक्षेत विशेष चमक दाखवली आहे. तालुक्‍यातील 32 शाळांपैकी तब्बल 27 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. परीक्षेला तालुक्‍यात 1488 विद्यार्थी बसले होते यापैकी 1475 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्‍याचा दहावीचा निकाल 99.12 इतका लागला असून 824 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. 

दहावीच्या निकालाची विद्यार्थ्यांबरोबर लागलेली उत्कंठा आज अखेर संपली. गेले दीड महिना लांबलेला निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईनने जाहीर झाला. कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा परिसरात आज दहावीच्या निकालामुळे वर्दळ दिसून आली. यंदा नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा एक टक्‍क्‍याने अधिक आहे. अनेक शाळांनी शंभर टक्केची परंपरा कायम राखली असून यंदा आजरा हायस्कूलने स्थापनेनंतरच्या इतिहासात प्रथमच शंभर टक्‍यात आपले नाव कोरले. 

शंभर टक्के निकाल असलेल्या शाळा, आजरा हायस्कूल, पंडीत दीनदयाळ विद्यालय, शारदाबाई चव्हाण गर्ल्स हायस्कूल, रोझरी इंग्लीश मेडिअम स्कूल, पार्वती शंकर हायस्कूल उत्तूर, उत्तूर विद्यालय, मडिलगे हायस्कूल, भादवण हायस्कूल, आदर्श हायस्कूल गवसे, एरंडोळ हायस्कूल, चाफवडे हायस्कूल, दाभिल हायस्कूल, रवळनाथ हायस्कूल देवर्डे, माऊली हायस्कूल धनगरमोळा, डायनॅमिक पब्लिक हायस्कूल सुळेरान, वाटंगी हायस्कूल, मलिग्रे हायस्कूल, आदर्श माध्यमिक विद्यालय सरंबळवाडी, केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी, महात्मा फुले हायस्कूल हात्तीवडे, आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंड, राजाभाऊ केसरकर हायस्कूल निंगुडगे, माध्यमिक विद्यालय आरदाळ, ल. बा. चोरगे हायस्कूल बेलेवाडी, कर्मवीर विद्यालय चिमणे, भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी, छत्रपती शिवाजी विद्यालय होन्याळी.

अन्य शाळांचे निकाल असे; व्यंकटराव हायस्कूल (99.06), झाकीर हुसेन उर्दु हायस्कूल (87.50), वसंतरावदादा पाटील हायस्कूल, उत्तूर (96.55), पेरणोली हायस्कूल (97.43), आदर्श हायस्कूल सिरसंगी (97.19). 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli breaks Viv Richards' record : विराट कोहलीने २०२५च्या शेवटच्या दिवशी मोडला विव्ह रिचर्ड्स यांचाही विक्रम!

Sankalp Kalkotwar : शिक्षक वडिलांनी दिलं पंखात बळ, आता नागपूरच्या मैदानात चमकतोय अहेरीचा खेळाडू

Beed Crime: परप्रांतीय ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pune Election Drama : एबी फॉर्मचा घोळ; नाराज इच्छुकांचे अर्ज; पुण्यात सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे संकट!

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

SCROLL FOR NEXT