One killed in accident near Ujlaiwadi kolhapur 
कोल्हापूर

उजळाईवाडी जवळ भीषण अपघातात एक ठार...

सकाळवृत्तसेवा

उजळाईवाडी (कोल्हापूर) - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार येथील उजळाईवाडी जवळ मयूर पेट्रोल पंप-भारती विद्यापीठ रोड जवळ मुख्य हायवेवर अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी चालक आनंदा तातोबा शेंडे (वय ४०) रा.खापरे माळ, गोकुळ शिरगाव जागीच ठार झाला असून अपघाताचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात अवजड वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी क्रमांक( एम.एच -०९- इ.सी-१३८०)  दुचाकीचालक जाग्यावरच ठार झाला. त्याचा मृतदेह रस्त्यावर छिन्न विछिन्न अवस्थेत स्थितीत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व उजळाईवाडी महामार्ग पोलीस कर्मचारी उपस्थित होते.हा अपघात गुरुवारी रात्री ८ च्या दरम्यान घडला असून मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT