one manatrik swindled rupees 6 crore creating disputes between wife and husband in belgaum 
कोल्हापूर

बेळगावात कन्नड मधील प्रसिद्ध गीतकार पती पत्नीमध्ये भांडण लावून मांत्रिकाने लुटले 6 कोटी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : प्रसिद्ध चित्रपट गीत आणि संगीतकार के. कल्याण व त्यांची पत्नी अश्विनी यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करुन कल्याण यांच्या सासू-सासऱ्याची तब्बल सहा कोटींची मालमत्ता भामटा मांत्रिक शिवानंद वाली याने लाटली आहे. त्यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह स्थावर मालमत्तांचाही समावेश आहे. दागिन्यांसह कागदपत्रे जप्त केली आहेत, अशी माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्‍त डॉ. विक्रम आमटे यांनी सोमवारी (१२) पत्रकार परिषदेत दिली.

शिवानंद वाली याने त्याची सहकारी गंगा उर्फ ज्योती कुलकर्णी हिला सोबत घेऊन कल्याण यांची पत्नी अश्विनी, सासरे कृष्णा सात्विक व सासू राधिका सात्विक या तिघांचे वशीकरण करुन त्यांना बंगळूरहून बेळगावात आणले. तुमच्या नावावर मालमत्ता असेल तर तुमच्या जिवाला धोका आहे, असे सांगत त्याने कल्याण यांच्या सासू-सासऱ्यांकडून भूखंड, फ्लॅट अशी सहा कोटींची मालमत्ता नावावर करुन घेतली. यापैकी दोन मालमत्ता त्याच्या प्रत्यक्ष नावावर झाल्या असून चार मालमत्तांचे शिवानंद वालीने स्वतःच्या नावे वटमुखत्यारपत्र करून घेतले आहे.

शिवानंद वालीने सुमारे चाळीस लाखांहून अधिक रक्कम, ३५० ग्रॅम सोने, ६०० ग्रॅम चांदी घेतली आहे. या मालमत्तेतून शिवानंद वालीने १० मॅक्‍सिकॅब खरेदी केल्या असून पोलिसांनी त्याही जप्त केल्या आहेत. पोलिस कोठडीत शिवानंद वालीकडून ही सर्व माहिती मिळाल्याचे डॉ. आमटे यांनी सांगितले. याशिवाय वाली याची साथीदार गंगा कुलकर्णीचा शोध सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. माळमारुती पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी.आर गडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT