one more corona patient found in kagal kolhapur 
कोल्हापूर

शहरात खळबळ ; कागलमध्ये सापडला कोरोना पॉझिटिव्ह ; कागल होते शंभर दिवस कोरोनापासून दूर

सकाळ वृत्तसेवा

कागल (कोल्हापूर) : गेले शंभर दिवस कोरोनापासून दूर असलेल्या कागल शहरात  एका 29 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यशिला पार्क येथे हा तरुण राहतो. या तरुणाच्या अहवालानंतर कागल शहरात खळबळ उडाली आहे. कागल नगरपालिकेच्यावतीने तातडीने यशिला पार्क सील करण्यात आला आहे. हा पार्क कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय जवळच्या जयसिंगराव पार्क व शाहू कॉलनी, कारखाना कॉलनी हे परिसरही ही सिल करण्यात येत आहेत. यशिला पार्कमध्ये औषध फवारणी करून परीसर निर्जंतुकीकरण केला जात आहे.


हेही वाचा- डॉक्‍टरच कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याने चिंता 

हा युवक कोल्हापूर येथे नोकरीस आहे. ता. २३पासून तो आजारी असल्याने कामावर गेलेला नाही. ता. २९ रोजी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. मात्र ताप कमी न आल्याने त्याने कागल कोरोना केंद्रावर तपासणी केली. त्या ठिकाणी त्याचा स्वॅब घेण्यात आला. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या घटनेने कागल शहरात खळबळ उडाली. सदरचा युवक हा पत्नी, आई व दीड वर्षाच्या मुलासह राहतो. पत्नी व दीड वर्षाचा मुलगा गावी 15 दिवसापूर्वी गावी गेले आहेत. या युवकाच्या जवळच त्याची बहीण राहते.तसेच सदरच्या युवक हा नारळ विक्री करत असल्याचे समजते. त्याने कागल सह परिसरातील काही गावातील व्यापाऱ्यांना नारळ विक्री केल्याची चर्चा आहे. 


दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी हा युवक माळभागातील एका हॉटेलमध्ये चहापानासाठी थांबल्याची चर्चा आहे. या हॉटेलमध्ये परिसरातील महाविद्यालय, शासकीय कार्यालये, तसेच कामगारांची वर्दळ असते. त्यामुळे एकूणच कागल शहरात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाकडून सदर युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. त्याच्या संपर्कातील त्याची आई, चुलते, चुलती, चुलत भाऊ आणि भावाची पत्नी यांना तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.दरम्यान मुख्याधिकारी पंडीत पाटील यांनी, कागल शहरातील नागरीकांनी घराबाहेर न पडता, सुरक्षीत राहावे, काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यातील विसंवाद काल पासून दूर होण्यास सुरुवात

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT