one more funeral corona positive person in ichalkaranji 
कोल्हापूर

ब्रेकिंग - इचलकरंजीत पुन्हा झाला गोंधळ : अंत्यसंस्कार झाले अन् रिपोर्ट आला पॉझिटिव्ह कोणाचा वाचा....

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरात पुन्हा एकदा त्रिशुल चौक घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.  वर्धमान चौक परिसरातील एका वृद्धाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. या वृध्दावर येथील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची तारांबळ उडाली असून मयत वृद्धाच्या नातेवाईकांसह अंत्यसंस्काराला गेलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. यामुळे संबंधित रुग्णालयाचा बेफिकीरपणा समोर आला आहे.


 कांही दिवसापूर्वी त्रिशुल चौक येथील वृद्धाचा येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्याच्यावर अंत्यविधी करीत असतानाच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे अंत्यविधीसाठी गेलेल्या सर्व नागरिकांना थेट विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या कनेक्शनमधून आतापर्यंत १५ जण बाधित झाले आहेत.


 अशाच प्रकारच्या घटनेची शहरात पुनरावृत्ती झाली आहे. वर्धमान चौकातील एका ७३ वर्षीय वृध्दावरती कोल्हापू येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहावर रविवारी सायंकाळी येथील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या वध्दाचा अहवाल सोमवारी रात्री पॉझिटीव्ह आला. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची तारांबळ उडाली. अंत्यसंस्कारला गेलेल्या नागरिकांसह घरातील नातेवाईकांना तातडीने विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. यांचा स्वॅब तपासासाठी पाठविण्यात येणार आहे. यामुळे वर्धमान चौक परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT