one person died in ichalkaranji kolhapur police arrested by accused 
कोल्हापूर

कोल्हापूर : इचलकरंजीजवळ तरूणाचा खून; संशयित ताब्यात

ऋषिकेश राऊत

तारदाळ (कोल्हापूर) : अज्ञातांनी एका वाहिफणी कामगाराला मारहाण करून त्याचा मृतदेह संगमनगर येथील एका मोकळ्या जागेत टाकल्याची घटना घडली. अलिम गदवाल (वय 40, रा. डॉ. लांडे हॉस्पिटलजवळ, इचलकरंजी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका रेकॉर्डवरील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी रात्री तारदाळ मधील संगमनगर येथील एका धाब्यासमोर घडली. घटनास्थळी शहापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पार्वती इंडस्ट्रिज समोरील संगमनगर येथे कोल्हापूरी धाब्याजवळ एका युवकाचा मृतदेह पडल्याचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास निदर्शनास आले. घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव घेतली. मृत व्यक्ती इचलकरंजी येथील असून त्याच्या पाठीवर आणि कमरेवर जबरी मार दिल्याचे दिसून येत होते. जबरी मारहाणीमुळे त्याच्या पृष्ठभागावर प्रचंड व्रण होते. घटनास्थळी डीवायएसपी बी. बी. महामुनी यांनी भेट दिली. मृत अलिम सोमवारी रात्री अज्ञातांनी मारहाण करण्याची धमकी दिली होती. किरकोळ सायकल चोरी प्रकरणातून त्यास जबरी मारहाण केल्याने तो गतप्राण झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. संशयित मारेकर्‍यांना पकडण्यासाठी गुप्त पथके रवाना केली आहेत. घटनास्थळी अलिमच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Stock Market Crash Today: काल तेजी, आज क्रॅश! शेअर बाजार अचानक का कोसळला? जाणून घ्या 5 मोठी कारणं

Ashok Kharat: भोंदू बाबाची 'स्पेशल २६ टीम'... बनावट छापे टाकण्यात अन् व्यापाऱ्यांना धमकावून जाळ्यात ओढण्यात माहिर

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

तरुणीच्या विनयभंग प्रकरणात अटक होईल, ५५ वर्षीय प्राचार्याला धमकावत ७ लाख उकळले; PSI, रिलस्टार महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा

दुनियादारी फेम अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी! सुरुवातीच्या काळात नायकाची भूमिका नाकारली, पण मालिकांनी बदललं आयुष्य

SCROLL FOR NEXT