one porcupine attack dog and dead but baby live in kolhapur jeur village 
कोल्हापूर

भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात मादी साळींदराचा मृत्यू ; पिल्लू वाचल

शिवाजी यादव

कोल्हापूर : भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात जेऊर (ता. पन्हाळा) येथे आज मादी साळींदराचा मृत्यू झाला. गर्भवती असलेल्या मादी साळींदराचे एक पिल्लू मृत पावले तर दुसरे छोटे पिल्लू मात्र जीवंत सापडले असून वनविभागाने त्याला सुरक्षीत ताब्यात घेतले आहे. 
भटक्‍या मोकाट कुत्र्यांचा उपद्रव सर्वच भागात दिसत आहे. जिल्हाभरात दररोज 20 ते 40 व्यक्तींवर भटक्‍या कुत्र्यांकडून हल्ला होत आहे. दानवाड (ता. शिरोळ) परिसरात दोन शेतकरी महिलांवरही भटक्‍या कुत्र्याने हल्ला केला या घटनेपाठोपाठ आता भटक्‍या कुत्र्यांनी वन्यजीवांनाही लक्ष केल्याची प्रचिती जेऊर येथील घटनेवरून दिसत आहे. 

सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जेऊर परिसरात पन्हाळा गडा लगत जंगल आहे. या भागातील साळींदर जंगला बाहेर आले. त्या साळींदरावर भटक्‍या कुत्र्यांनी हल्ला केला त्यानंतर साळींदर मृतावस्थेत पडल्याचे प्राणी मित्रांनी पाहिले. त्याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने येथे पहाणी केली असता मृत साळींदराची छोटे पिल्लू जीवंत असल्याचे दिसले. त्याला ताब्यात घेतले तसेच त्याची प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती वनपाल विजय दाते यांनी दिली. 

...यांची झाली मदत 

वाईल्ड लाईफ प्रोटेक्‍शन ऍण्ड रिसर्च सोसायटीचे प्रदीप सुतार, अलमतीन बागी यांच्यासह प्राणी मित्र महेश खेतल, कृष्णात महाडीक यांनीही पिल्लाला सुरक्षीत ठेवण्यासाठी मदत कार्य केले. असे माहिती सुत्रांकडून देण्यात आली. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT