One thousand 916 persons were released in four days in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूरकरांना मोठा दिलासा ; 4 दिवसात तब्बल एवढ्या जणांची कोरोनावर मात 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. अशा स्थितीत गेल्या चार दिवसात एक हजार 916 व्यक्ती व्यक्तीकोरोना मुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील 14 कोविड सेंटरवर जवळपास दोन हजार बेड खुले झाले आहेत. त्यामुळे नव्याने कोरोनाबाधित सापडणाऱ्यांच्या उपचारासाठी बेड उपलब्ध होण्यास मदत होत आहे. 

जिल्ह्यातील 14 कोविड सेंटरवर होणाऱ्या आरोग्य तपासणीत दिवसाकाठी सरासरी 1 हजारावर स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येतात. त्यांची शेंडापार्क येथील जिल्हा शासकीय प्रयोगशाळेसह अन्य पाच प्रयोगशाळात स्वॅब तपासणी केली जाते. त्यात रोज किमान 500 हून अधिक कोरोनाबाधित येत आहेत. गेल्या तेरा दिवसात सर्वाधिक संख्येने कोरोनाबाधित आढळल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बेड मिळणेही मुश्‍कील झाले. 

सीपीआरमध्ये जवळपास 300 वर रूग्णांवर उपचार होत आहेत. यातील जवळपास दिडशेवर व्यक्‍ती गंभीर आहेत. त्यामुळे अन्य रूग्णांसाठी येथे जागा मिळणेही मागील आठवड्यात मुश्‍कील झाले. गेल्या तीन दिवसात मात्र सीपीआरमधील 110 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. अन्य 14 कोविड सेंटरवर जवळ प्रत्येकी 50 ते 100 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यामुळे तेवढे बेड शिल्लक होण्यास मदत झाली. गेल्या दोन दिवसात जितके कोरोनाबाधित आले, त्यांना रिकाम्या झालेल्या बेडवर दाखल करून घेतले आहे. त्यासाठी र्निजतुंकीरणाची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात राबविली आहे. 


कोरोनामुक्तांची आकडेवारी अशी ः 
13 ऑगस्ट - 176 
14 ऑगस्ट - 504 
15 ऑगस्ट - 544 
16 ऑगस्ट - 692 


संपादन- धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT