The one who takes action is trapped; Complaint against "bribery" by pot traders 
कोल्हापूर

कारवाई करणारेच जाळ्यात ;  मटका व्यावसायिकांकडून "लाचलुचपत'कडे फिर्याद

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात मटका बंद असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी केलेल्या कारवाईचा गाजावाजाही एकीकडे केला जातो. पण, दुसरीकडे जिल्ह्यात मटका सुरू असल्याचे नुकत्याच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून स्पष्ट झाले. इतकेच नव्हे, कारवाई करणाऱ्याच लोकांनी काळेधंदेवाल्यांना पाठिशी घातल्याप्रकरणी ते विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. एकंदरीत जिल्ह्यात मटक्‍यासह अवैध धंदे बंद आहेत की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे. 
मावळते पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्याबरोबर काळेधंदेवाल्यांच्या मुसक्‍या आवळण्यास सुरवात केली. यादवनगरात एप्रिल 2019 मध्ये मटका मालकाच्या साथीदाराने थेट पोलिसांवर हल्ला केला. यानंतर संबंधित मटका मालक व त्याच्या टोळीवर पोलिसांनी थेट संघटित गुन्हेगारी मोकांतर्गत कारवाई केली. शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी कोल्हापूर मटक्‍याचे सांगली, सातारा, मुंबई, गुजरातचे कनेक्‍शन शोधून काढले. अवैध धंद्यात सापडले तर थेट मोकांतर्गत कारवाई होते. अशी काळेधंदेवाल्यांत भीती निर्माण झाली. तसे काळेधंदेवाले थंड होते. महिनाभरात डॉ. देशमुख यांच्या बदलीची जशी चर्चा सुरू झाली, तशी काळेधंदेवाल्यांनी डोके वर काढण्यास सुरवात केली. पण, जिल्ह्यात सारे काही आलबेल आहे, असा गाजावाजा होतोय. पण, जिल्ह्यात मटका सुरू असल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून पुढे आला. इतकेच नव्हे, तर काळेधंदेवाल्यांवर कारवाई करणारेच "लाचे'च्या प्रकरणात अडकल्याचेही उघड झाले. तसे अवैध धंदे बंद असा नुसता गवगवा आहे का, याबाबत नागरिकांतून शंका व्यक्त होत आहे. 


अशांच्या बदल्याच कशा होतात? 
शहरातील काही बडे गुन्हेगार हे काही पोलिसांमुळे मोठे झाले आहेत. एवढेच नव्हे, तर एखाद्या गुन्ह्यात आरोपी मिळत नसेल तर अशा गुंडांची मदतच हे पोलिस घेतात. काल (ता. 19)च्या कारवाईत सापडलेला पोलिस पूर्वी आयजींच्या पथकात होता. त्याठिकाणी काहीतरी भानगड केल्यावर त्याची बदली "एलसीबी'त करण्यात आली. तिथेही या बहाद्दराने दिवे लावल्यावर शिक्षा म्हणून त्याची बदली पेठवडगावला केली. पण, तेथूनही तो पुन्हा राजारामपुरीत आला आणि कारवाईत सापडला. अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या कोणाच्या सांगण्यावरून होतात, याचाही पर्दाफाश यानिमित्त होण्याची गरज आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बनावट आयपीएसने आधीही केलेत कांड, परराज्यात नावावर गुन्हा; पत्नी आहे पोलीस अधिकारी

Sharad Pawar & Ajit Pawar : जे कोल्हापुरात होतं ते राज्यात होतं, स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवार; अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार

Leopard Attacks: शिरूरमध्ये संतापाचा स्फोट! बिबट्यांच्या हल्ल्यांवर निष्क्रिय प्रशासनाविरोधात तहसीलदार कार्यालयाला टाळे"

Latest Marathi News Live Update : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार

Girish Mahaja : नाशिक-त्र्यंबक रस्ता पाडकाम वाद मिटला! गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर १३ दिवसांचे साखळी उपोषण स्थगित

SCROLL FOR NEXT